Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: विधान परिषदेच्या उपसभापती निलमताई गोऱ्हे यांनी केले गोवरीच्या सरपंच आशाताई उरकुडे यांच्या कार्याचे कौतुक
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
कोरोना काळात गोवरी गावात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांची थोपटली पाठ कोरोनामुक्त गावातील सरंपचांनी केले अनुभव कथन आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स च...
  • कोरोना काळात गोवरी गावात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांची थोपटली पाठ
  • कोरोनामुक्त गावातील सरंपचांनी केले अनुभव कथन
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
चंद्रपूर -
कोरोनाचे संकट हे एका महायुध्दाप्रमाणे आहे. या लढ्यात शासन, प्रशासन, सामाजिक संघटना, नागरिक सर्व एकजुटीने लढत आहे. जिल्ह्यातील 1200 गावांपैकी 313 गावे सुरवातीपासून कोरोनामुक्त ठेवण्यास प्रशासनाला यश आले असून सद्यस्थितीत बहुतांश तालुक्यांची वाटचाल कोरोनामुक्तीकडे सुरू आहे. कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अतिशय चांगले उपक्रम राबविले असल्याची माहिती विधान परिषदेच्या उपसभापती निलमताई गोऱ्हे यांनी दिली.
कोरोनाकाळात खनीज विकास निधीचा सर्वात चांगला उपयोग चंद्रपूर जिल्ह्याने केला, असे सांगून उपसभापती गोऱ्हे म्हणाल्या, चंद्रपूरचा हा आदर्श इतरही जिल्ह्यांनी घ्यावा. तसेच जनजागृतीकरीता गावपातळीवर लाऊडस्पीकर सिस्टीमचा चांगला उपयोग करण्यात आला. गावपातळीवर व्हॉट्सॲप ग्रुप करणे, रोजगार हमी योजनेच्या कामावरील नागरिकांची ॲन्टीजेन टेस्ट करणे, ग्रामपंचायतीच्या 15 व्या वित्त आयोगाच्या निधीतून कोरोनाविषयक उपाययोजनेसाठी उपक्रम राबविणे आदी बाबी करण्यात आल्या आहेत. आपले गाव, आपले शहर, आपला जिल्हा कोरोनामुक्त करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याची कार्यपध्दती वेगवेगळी राहिली आहे. या काळात सर्वांनाच खूप काम करावे लागले व आजही करावे लागत आहे.
यावेळी राजुरा तालुक्यातील गोवरी येथील सरपंच आशा बबन उरकुडे, मुल तालुक्यातील राजगड येथील सरपंच चंदू पाटील मारकवार, भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा येथील सरपंच नयन जांभुळे, दुर्गापूर येथील सरपंच पूजा मानकर आदींनी आपापल्या गावात केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. 
राजुरा तालुक्यातील गोवरी येथे कोरोनाचे १०२ बाधित निघाले होते. तेव्हा गावच्या कर्तव्यदक्ष सरपंच यांनी लोकांच्या आरोग्याची गंभीर दाखल घेत तातडीने उपाययोजना करण्यात सुरुवात केली. गावाची सीमा सील करून आरोग्या विभागाच्या मदतीने गावातील सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली. गरजुंना या काळात जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा, आयसोलेशन मध्ये असणाऱ्यांना दररोज फळ वाटप, संपूर्ण गाव सॅनिटायझर, धूर फवारणी प्रशासकीय स्तरावर अधिकाऱ्यांना भेटून उपाययोजना आखण्यात आल्या. यात आशाताईंना आरोग्य विभागाचे भरभरून सहकार्य मिळाले. यामुळे १०२ बाधित निघाल्यानंतरही त्यातील एकही बाधित दगावला नाही व अवघ्या १५-२० दिवसात संपूर्ण गोवरी गाव कोरोनमुक्त झाले. आशाताईंचे कार्य पाहून 
येथील सरपंच आशा बबन उरकुडे यांच्या नेतृत्वात निलमताई गोऱ्हे यांनी कोरोना काळात गोवरी गावात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांची पाठ थोपटली व कोरोना काळात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांच्या कार्यांचे भरभरून कौतुक केले. 
निलमताई गोऱ्हे यांनी गोवरी व इतर गावातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचे कौतुक करताच गावात आनंद व्यक्त करण्यात आला तसेच प्रशासनाने पारितोषिक ठरविलेल्या यादीत गावाचे नांव येईल अशी "आशा" गावातील हितचिंतकांनी व्यक्त केली आहे. 
यावेळी आमदार दुष्यंत चतुर्वेदी, प्रशासकीय अधिकारी, शिवसेना संपर्क प्रमुख प्रशांतदादा कदम, शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे, शिवसेना राजुरा विधानसभा समन्वयक बबनभाऊ उरकुडे, ग्रामसेवक संजय तुराडे, ग्राम पंचायत सदस्य नीलम कोसूरकर, नीलिमा देवाळकर, माजी ग्रापं सदस्य अमोल कोसुरकर, तुफान गिरी, तेजस पाचभाई यांच्यासह कोरोनामुक्त गावातील सरपंच, आशा स्वयंसेविका व इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 










About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top