चंद्रपूर -
शहरात आमदार जोरगेवार विरुद्ध भाजपा असं आंदोलन चांगलेच गाजले, आमदार जोरगेवार यांनी चंद्रपूर मनपातील घोटाळे जसे कोरोना काळात चारचाकी वाहन व त्या वाहनाला अतिविशिष्ट क्रमांक यासाठी तब्बल 70 हजार रुपये मोजण्यात आले. अमृत, कचरा संकलन घोटाळा इतकेच नव्हे तर भाजप शहराध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांचेवर रेमडीसीविर इंजेक्शन चा घोटाळा केला असे गंभीर आरोप लावण्यात आले होते.
या आरोपांचे भाजप शहराध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांनी खंडन केले असून आमदार जोरगेवार यांचे सर्व आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे, कोरोना काळात रेमडीसीविर इंजेक्शन जादा पैसे दिल्यावर सुद्धा रुग्णांना मिळत नव्हते, मात्र आम्ही शासना नियमांच्या अधीन राहून इंजेक्शनचा पुरवठा केला.
आमदार जोरगेवार यांच्यातर्फे असे आरोप करणे म्हणजे मानवी संवेदना संपविणारी आहे, राज्यात अनेक रुग्णालयाचे लेखा परीक्षण करण्यात आले त्यावर गुलवाडे कोविड सेंटर यावर पालिकेच्या लेखा परीक्षणात आक्षेप ठेवण्यात आला यावर प्रशासनासोबत आम्ही पत्र व्यवहार केला आहे. कोरोना काळात रुग्णांच्या उपचारासाठी आम्ही रात्र दिवस झटलो मात्र आता त्या सेवेचं आमदार जोरगेवार राजकारण करू पाहत आहे. कोरोना काळात आम्हालाही अनेक अडचणींना सामोरे जावे लागले मात्र कोरोना रुग्णांसाठी आम्ही त्या समस्यांचा सामना केला. स्थानिक आमदार जोरगेवार यांना रेमडीसीविर इंजेक्शन हॉस्पिटलमध्ये कसे पोहचत याची माहिती त्यांना नसावी कारण इंजेक्शन जे जिल्हाधिकारी, अन्न व औषध प्रशासनाच्या निगराणी खाली देण्यात येत होते. डॉ. गुलवाडे पुढे म्हणाले की आज मी भाजप या पक्षाचा शहराध्यक्ष बनल्याने आमदार जोरगेवार उठसूट माझ्यावर आरोप करीत आहे.
आमदार जोरगेवार यांना माझे आव्हान आहे त्यांनी केलेले आरोप सिद्ध करावे अन्यथा आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा, प्रसिद्धीच्या नादात त्यांनी माझ्यावर अनेक आरोप केले मात्र यावर मी गप्प बसणार नसून त्यांच्यावर मी आमदार जोरगेवार यांना नोटीस बजावली असून लवकरच त्यांच्यावर 5 कोटींचा मानहाणीचा दावा ठोकणार आहे अशी माहिती डॉ. गुलवाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.













टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.