Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: ओबीसींचे राजकीय आरक्षण पुर्ववत करा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
राजुरा काँग्रेसच्या ओबीसी विभागाचे तहसीलदारांना निवेदन आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स राजुरा - ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण पूर्ववत करण्याकरत...
  • राजुरा काँग्रेसच्या ओबीसी विभागाचे तहसीलदारांना निवेदन
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण पूर्ववत करण्याकरता महाराष्ट्र काँग्रेस ओबीसी विभागाचे प्रदेश अध्यक्ष भानुदासजी माळी यांच्या सूचनेनुसार राजुरा तालुका काँग्रेस ओबीसी विभाग यांच्या वतीने तहसीलदार हरीष गाडे यांना निवेदन देण्यात आले. याद्वारे ओबीसीचे राजकीय आरक्षण पुर्ववत लागू करण्यात यावे. तसेच त्यासाठी आवश्यक असणारा इम्पेरियल डाटा केंद्र सरकारने उपलब्ध करून द्यावा अशी मागणी तहसीलदारांमार्फत महामहिम राष्ट्रपती यांच्याकडे करण्यात आली आहे. 
या प्रसंगी नगराध्यक्ष अरुण धोटे, काँग्रेसचे ओबीसी विभागाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नंदकिशोर वाढई, अनंतराव एकडे, माजी सरपंच लहु चहारे,  कवळू  सातपुते, संदीप आदे, गजेंद्र ढवस, राजकुमार ठाकूर, ढेगळे पाटील, पत्रकार एम के शेलोटे, अनिल मेश्राम आदी उपस्थित होते.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top