Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: नांदाफाटा औद्योगिक परिसरात २३ दिवसापासुन कोविड लसीचा पुरवठा बंद
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
लस न मिळाल्यास आंदोलन छेडणार - शिवचंद्र काळे धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी गडचांदूर - नांदाफाटा औद्योगिक परिसरात मागील २३ दिवसांप...
  • लस न मिळाल्यास आंदोलन छेडणार - शिवचंद्र काळे
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
नांदाफाटा औद्योगिक परिसरात मागील २३ दिवसांपासून कोविड लस उपलब्ध नसल्याने येथील लसीकरण केंद्र ओसाड पडले आहे. येथील नागरिकांची लसीकरणा करिता वणवण भटकंती सुरू असून तालुक्यातील अनेक ठिकाणच्या लसीकरण केंद्रावर लसीकरणा करिता नागरिक पुढाकार घेत नसल्याचे चित्र आहे. 
नांदाफाटा हा परिसर औद्योगिक असल्याने येथील लोकसंख्या १५ हजाराच्या वर आहेत आरोग्य विभागाकडून नांदाफाटा येथील लसीकरण केंद्राला आत्तापर्यंत १३५० लसीचे डोस पुरवल्याची माहिती आहे, जे की लोकसंख्येच्या १० टक्केही नाही. प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे नांदाफाटा येथील लसीकरण केंद्रावर २३ दिवसांपासून लसच उपलब्ध झाली नाही. ८४ दिवसांपेक्षा जास्त दिवस झालेल्या अनेक नागरिकांना दुसऱ्या डोज करिता वणवण फिरावे लागत असून इतर लसीकरण केंद्रावर ताटकळत उभे राहावे लागत आहे. अनेक नागरिकांनी पहिला डोस घेतल्याला १०० दिवस होऊनही त्यांना अद्याप दुसरा डोस मिळाला नसल्याने त्यांची चिंता वाढली आहे. प्रशासनाकडून तिसऱ्या लाटेचा संसर्ग होण्याची भीती व्यक्त केली जात असून नागरिकांनी जास्तीत जास्त लसीकरण करावे असे वारंवार सांगितले जात आहे मात्र २३ दिवसापासुन लसीचा ठणठणाट आहे. येथील नागरिकांची लसीकरणाकरिता वणवण भटकंती सुरू असल्याने मनस्तापही सहन करावा लागत आहे लसीकरण केंद्रावर तातडीने लस उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिकांनी केली असून लवकर लास उपलब्ध करून नि दिल्यास येथील नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
आरोग्य अधिकार्‍यांना वारंवार नांदाफाटा येथील लोकसंख्येचा विचार करून नियमित लस उपलब्ध करून देण्याची विनंती करीत आहे. शासनाच्या कार्यप्रणालीनुसार आम्ही लसीकरणाचा कार्यक्रमाचे नियोजन करतो असे अधिकारी सांगत आहे. पहिल्या डोजला १०० दिवस उलटूनही अद्याप पावतो अनेक नागरिकांना दुसरा डोस उपलब्ध झाला नसल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. औद्योगिक परिसर व लोकसंख्येचा विचार करून तातडीने नांदाफाटा लसीकरण केंद्रावर लस उपलब्ध करून द्यावी अन्यथा नागरिकांना घेऊन आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
शिवचंद काळे
जिल्हा परिषद सदस्य 












About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top