Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: वाहनचालक प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शैलेश कोरांगे - आमचा विदर्भ प्रतिनिधी कोरपना - आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कोरपना तालुक्यातील आवारपूर येथील अल्ट्राटेक सिमेंट उद्योगात वाहन चालक...

शैलेश कोरांगे - आमचा विदर्भ प्रतिनिधी
कोरपना -
आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कोरपना तालुक्यातील आवारपूर येथील अल्ट्राटेक सिमेंट उद्योगात वाहन चालक प्रशिक्षण केंद्राचे उद्घघटन युनिट हेड श्रीराम पी एस यांच्या हस्ते पार पडले.









याप्रसंगी तांत्रिक विभाग प्रमुख संदीप देशमुख, मानव संसाधन विभाग प्रमुख संजय शर्मा, लॉजिस्टिक हेड धीरेन्द्र कुमार दास, सुरक्षा विभाग प्रमुख मिहिर भट्ट आदी उपस्थित होते. अल्ट्राटेक सिमेंट उद्योगात खाजगी वाहतूक दारांचे सुमारे दीड हजार वाहन चालक कार्यरत आहे. उद्योगाला आवश्यक असलेला कोळसा व कच्चामाल तसेच तयार सिमेंट वाहतूक करण्यासाठी दिवस-रात्र तैनात असतात. वाहनचालकांना सुरक्षितता आणि कायदेविषयक सविस्तर माहिती देण्यासाठी या सुसज्ज प्रशिक्षण केंद्राची उभारणी करण्यात आली.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top