- समाविष्ठ गावाकरिता स्वतंत्र नळ योजना तयार करा - आबीद अली यांची मागणी

शैलेश कोरांगे - आमचा विदर्भ प्रतिनिधी
कोरपना -
चंद्रपूर जिल्ह्यातील 15 तालुक्यांमध्ये शेकडो गावाकरिता पस्तीस प्रादेशिक नळ योजना भागविण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्यामार्फत 1996 ते 2000 या वित्त वर्षात कोट्यावधी चे नियोजन करून काम करण्यात आली त्यामधील आजही दोन दशक लोटूनही शेकडो गावे तहानलेली असल्याचे विदारक चित्र प्रादेशिक नळ योजनेच्या कारभारावरून दिसून येते अनेक ठिकाणी लांबच लांब पाइपलाइन असल्याने एका प्रादेशिक नळ योजनेमध्ये चार ते दहा गाव समाविष्ट करून नियोजन करण्यात आले होते मात्र झालेले बांधकाम अनेक ठिकाणी पाईपलाईन तुटण्याचा प्रकार यामुळे कोट्यावधी रुपये खर्च करून सुद्धा गाव पातळीवरील ग्रामीण पाणीपुरवठा समित्या एक आयोजित वेगवेगळ्या असलेल्या समाविष्ट ग्रामपंचायती नियोजन व जबाबदारी झटकण्याची प्रक्रिया यामुळे नेहमी जनतेचा रोष ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग यांच्यावरच दिसून येतो मात्र अनेक योजना घडाई पेक्षा मळाई अधिक होत असल्याने स्वातंत्र्याच्या 75 वर्ष लोटूनही शेकडो गावे पाण्याच्या अधिकारापासून वंचित आहे गेल्या एक दशकापासून प्रशासन व लोकप्रतिनिधी कडे सातत्याने गाव निहाय नियोजन करून प्रादेशिक नळ योजनेमधून गावे वगळा व त्या ठिकाणी बोरवेल किंवा विहिरीचे खोदकाम करून पाण्याची सुविधा उपलब्ध करा अशी मागणी केल्या गेली पाणीपुरवठा करिता अनेक उपक्रम जलस्वराज भारत निर्माण स्वच्छ पाण्याचा अधिकार अशा अनेक उपक्रमातून नियोजन केल्या गेले तर काही गावांमध्ये सातत्याने दुरुस्तीचे काम करून सुद्धा पाणी पोहोचले नाही शासन वेळोवेळी दुरुस्तीवर लाखोंचा खर्च करण्यापेक्षा जीर्ण झालेल्या अनेक योजना पांढरा हत्ती ठरत असल्याने व अधिक प्रमाणात खर्च निधीचा अभाव यामुळे ग्रामीण पाणीपुरवठा योजनेवर होणारे परिणाम वसुलीची टक्केवारी अल्प यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील पस्तीस प्रादेशिक नळ योजना पांढरा हत्ती ठरत असल्याने तसेच कोरपना तालुक्यातील चार प्रादेशिक नळ योजनेमध्ये चौतीस गावाचा समावेश आहे परंतु यातील दहा टक्केही गावांना सुरळीतपणे पाणीपुरवठा होत नाही एक ना धड भाराभर चिंध्या अशी अवस्था प्रादेशिक नळ योजनेची झाली असल्याने शासन आणि प्रादेशिक नळ जिल्ह्यातील सर्व गावे वगळून त्या गावांमध्ये पाईप लाईन टाकीचे काम सुव्यवस्थित आहे अल्प खर्चामध्ये त्याठिकाणी सुरळीतपणे पाणीपुरवठा होऊ शकतो याकरिता गावपातळीवरच पाणी स्त्रोत बळकटीकरण बोरवेल किंवा विहिरीवरून योजना तयार केल्यास गावपातळीवरील ग्रामपंचायत ग्रामीण पाणीपुरवठा समिती यांचे सनियंत्रण देखरेख वसुली यास बाबीवर नियंत्रण राहू शकतो म्हणून अपयशी ठरलेल्या प्रादेशिक योजना हद्दपार करून जल जीवन मिशन अंतर्गत जिल्हाभरातील संपूर्ण गावांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा अधिकार उपलब्ध करून देण्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम आखण्यात या आखण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आबिद अली यांनी केली असून गेल्या तीन दशकात अनेक प्रादेशिक नळ योजना पांढरा हत्ती ठरल्याने तालुक्याचे ठिकाण असलेल्या कोरपणा येथे स्वतंत्रा चे 75 वर्ष साजरे होत असताना 1998 व 2015 मध्ये या शहराकरिता दोन योजना तयार झाल्या कोट्यावधी रुपये खर्च करूनही नळाला पाणी पोहोचले नाही व योजना फस्त ठरली ग्रामपंचायतीचे रुपांतर नगर पंचायतीमध्ये होऊन सुद्धा तीन कोटी रुपये खर्चाची योजना 2015 मध्ये तयार करून सुद्धा तब्बल पाच वर्षात एक कोटी फस्त करण्यात आले मात्र नागरिकां ची तहान भागलेली नाही अशी परिस्थिती असून जिल्हाभरातील सर्व प्रादेशिक नळ योजना निर्लेखित करून गाव तिथे नियोजन करण्याची मागणी ग्रामीण पाणीपुरवठा स्वच्छता विभागाचे मंत्री गुलाबराव पाटील जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार खासदार बाळू धानोरकर आमदार सुभाष धोटे मुख्य कार्यपालन अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांना पाठवलेल्या निवेदनातून केली असून एकदा योजना हद्दपार करून लोकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करा अशी मागणी निवेदनातून केली आहे










टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.