Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: प्रियकराने केली विवाहित प्रेयसीची हत्या
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
धारदार शस्त्राने वार आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स नागभीड - लग्न होऊन नवऱ्याशी मतभेद झाल्यावर पत्नीने थेट माहेर गाठलं, मात्र माहेरी तिचे सं...
  • धारदार शस्त्राने वार
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
नागभीड -
लग्न होऊन नवऱ्याशी मतभेद झाल्यावर पत्नीने थेट माहेर गाठलं, मात्र माहेरी तिचे संबंध दुसऱ्या युवकाशी जुळले, परंतु दुसऱ्या युवकासोबत सुद्धा भांडण झाले याचा राग मनात घेत त्या प्रियकराने विवाहित प्रेयसीच्या घरी जात तिच्या गळ्यावर धारधार शस्त्राने हल्ला केला यामध्ये विवाहित प्रेयसीचा जागीच मृत्यू झाला.
पूजा रवींद्र सलामे वय 28 असे मृत विवाहित महिलेचे नांव. मृतकाचे विवाह चिखल परसोडी येथील बागडे नामक युवकासोबत झाला होता. मात्र नवऱ्याशी मतभेद झाल्याने पूजा ने नागभीड येथे असलेलं माहेर गाठलं, काही दिवस माहेरी राहिल्यावर परसोडी येथील 25 वर्षीय युवक विवेक ब्रह्मदास चौधरी सोबत पुजाचे प्रेमसंबध जुळले. मागच्या महिन्यात पूजा व विवेक यांचं काही कारणावरून भांडण झाले होते, भांडणाचा निपटारा करण्यासाठी विवेक आज सकाळी पूजाच्या घरी आला, त्यावेळी पुजाची आई घराबाहेर गेली असल्याने विवेकने या संधीचा फायदा घेत पूजाच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केले. अचानक झालेल्या हल्ल्यात पूजाचा जागीच मृत्यू झाला, आरोपी विवेकने आपल्या प्रेयसीची हत्या केल्यावर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गुन्हा कबूल केला. नागभीड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मडामे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि कोरवते यांनी घटनास्थळ गाठत पंचनामा करीत, मृतदेह शवविच्छेदन करीता पाठविण्यात आले. आरोपी विवेक वर कलम 302,452 भादवी सहकलम 3(2)(5) अनु जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 सुधारीत 2015 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास नागभीड पोलीस करीत आहे. 










About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top