Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: अपक्ष नगरसेवक भागवतोय नागरिकांची तहान
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची पायपीट पाहून राजूभाऊ डोहे भारावले स्वखर्चाने स्वतःच्या तीन टँकरने करतायेत पाणी पुरवठा सर्वांना पाणी मिळत आह...
  • पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची पायपीट पाहून राजूभाऊ डोहे भारावले
  • स्वखर्चाने स्वतःच्या तीन टँकरने करतायेत पाणी पुरवठा
सर्वांना पाणी मिळत आहे कि नाही, पाहतांना राजेंद्र उर्फ राजू डोहे
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
दि. २१ जुलै पासून सुरु झालेल्या पावसाने दि. २२ जुलैला अक्षरशः थैमान घातले. तालुक्यात पूरसदृश्य स्तिथी निर्माण झाली. वर्धा नदीत पाण्याची पातळी वाढल्याने राजुरा वासियांची तहान भावण्याकरिता नप ची नळ योजनेचे पाइपजोडणी क्षतिग्रस्त झाली त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्याची समस्या जाणवू लागली. नगर परिषदेने नागरिकांच्या हितासाठी टँकर ने पाणी पुरवठा सुरु केला मात्र विरोधकांच्या परिसरात कोणत्याही कार्यात अडथळा टाकायचा हे सत्ताधाऱ्यांचे धोरण सर्वांना सर्वश्रुत आहेतच. अश्या धोरणामुळे हंडाभर पाण्यासाठीही नागरिकांना जीवाचे रान करावे लागत होते. पिण्याच्या पाण्यासाठी वॉर्डवासीयांची पायपीट होऊ लागली. वॉर्डवासीयांची पायपीट पाहून अपक्ष नगरसेवक तथा शिवसेना तालुका प्रमुख राजूभाऊ डोहे हे भारावले. त्यांनी स्वखर्चाने आपल्या स्वतःच्या तीन टँकरने पाणीपुरवठा करायला सुरुवात केली. हळू हळू दुसऱ्या वॉर्डातील लोकांनी सुद्धा फोन करून पाण्याची मागणी केली. समाजसेवेचे धोरण अंगिकारलेल्या राजूभाऊ डोहे यांनी इतरही गरजवंतांना स्वखर्चाने स्वतःच्या टँकरने पाणीपुरवठा केला. कोणताही गाजावाजा ने करता हे समाजसेवेचे त्यांचे कार्य गुपचूप सुरु होते मात्र सोशल मीडियावर ते स्वतः टँकर चालवून पाणी पुरवठा करतांना आणि पाणी पुरवठा होताना सर्वांना पिण्याचे पाणी मिळत आहे कि नाही हे पाहत असतानाचे फोटो व्हायरल झाल्यावर परिसरातील इतर नागरिकांना त्यांचा कार्याची प्रचिती झाली. त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. 

गरजू नागरिकांना पाण्यासाठी पायपीट, गैरसोय होऊ नये. जोपर्यंत नपची नळ योजनेद्वारे पाणी मुबलक प्रमाणात येणार नाही तोपर्यंत नागरिकांना स्वखर्चाने स्वतःच्या टँकरने पाणी पुरवठा करू. असे वचन अपक्ष नगरसेवक तथा शिवसेना तालुका प्रमुख राजूभाऊ डोहे यांनी दिले. 

समाजात बदल करण्याची उमेद घेवून, परिवर्तनाची काठी हाती घेवून निघालेले तरुण काय करू शकतात याचे हे एक सर्वोत्कृष्ट उदाहरण शहरात पाहायला मिळत आहे.  
सुपरवायझर - भाऊ आज टॅंकर चालवणारा कोनीच नाही आहे.......
राजू डोहे - आबे तर का लोकांले पाण्याविना मारते का भडवीच्या, मले दे टँकरची चावी
"चाला बे बसा, मी चालवतो टँकर......." 










About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top