Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: सुदृढ आरोग्यासाठी आहारात रानभाज्यांचा समावेश आवश्यक - आमदार सुभाष धोटे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
विरेन्द्र पुणॆकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी राजुरा - संपूर्ण जिल्ह्यात दिनांक ९ ते १५ ऑगस्ट २०२१ दरम्यान रानभाजी महोत्सव सप्ताह राबविण्यात येत ...
विरेन्द्र पुणॆकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा -
संपूर्ण जिल्ह्यात दिनांक ९ ते १५ ऑगस्ट २०२१ दरम्यान रानभाजी महोत्सव सप्ताह राबविण्यात येत आहे. या अंतर्गत तहसील कार्यालय राजुरा येथे रानभाजी महोत्सव आयोजित करण्यात आले. या महोत्सवाचे उद्घाटन आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते करण्यात आले. 
या प्रसंगी मार्गदर्शन करताना आमदार सुभाष धोटे म्हणाले की धान्य, कडधान्य यांच्यानंतर मानवी आहारातील प्रमुख घटक म्हणजे भाजी. खोड, पाने, फळे, बिया, कंदमुळे, फुले यांचा वापर केला जातो. रानभाज्यामध्ये विविध प्रकारचे शरीराला आवश्यक असणारे पौष्टिक अन्नघटक असतात. सुदृढ आरोग्यासाठी आपल्या आहारात रानभाज्यांचा समावेश आवश्यक आहे. या महोत्सवात तालुक्यातील रानभाजी उत्पादक शेतकरी, शहरी व ग्रामीण भागातील जनतेने मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन रानभाज्यांचे प्रकार, महत्त्व समजून घ्यावे व आपल्या दैनंदिन आहात त्यांचा समावेश करावा असे आवाहन केले. महोत्सव यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. 
या प्रसंगी उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, उपविभागीय कृषी अधिकारी गोविंद मोरे, तहसीलदार हरिश गाडे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, उपसभापती मंगेश गरुनुले, प. स. सदस्य कुंदा जेनेकर, तालुका कृषी अधिकारी मकपल्ले, चंदनबाटवे तसेच निसर्ग शेतकरी महिला बचत गट पंचाळा येथील शेतकरी महिला तसेच परिसरातील रानभाज्या उत्पादक शेतकरी, नागरिक उपस्थित होते. 













About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top