Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: इन्फट कान्वेंट येथे इयत्ता १० वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा आमदार सुभाष धोटे यांचे हस्ते सत्कार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
विरेन्द्र पुणॆकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी राजुरा - नुकत्याच जाहीर झालेल्या इयत्ता १० वी च्या निकालात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या इन्फट जिसस इं...
विरेन्द्र पुणॆकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा -
नुकत्याच जाहीर झालेल्या इयत्ता १० वी च्या निकालात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या इन्फट जिसस इंग्लिश पब्लिक हायस्कूल राजुराच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आज आमदार सुभाष धोटे आणि उपस्थित मान्यवरांचे हस्ते करण्यात आला. यात ९५.४० % घेऊन इन्फंट कान्व्हेंट मधून प्रथम येणाऱ्या कु. आस्था गोरे व कु. श्रृती पुणेकर, ९४. २० % घेऊन द्वितीय येणारी कु. पुनम कोरडे आणि ९०.६० % घेऊन तृतीय येणारी  कु. पुर्वा शदारपवार यासह सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. 
या प्रसंगी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना आमदार सुभाष धोटे म्हणाले की सत्कारातून गुणवंत विद्यार्थ्यांना  सकारात्मक ऊर्जा मिळते. आपल्या यशाची दखल घेतली जाते. आपण आनखी सातत्यपूर्ण परिश्रमाने मोठे यश मिळवावे अशी प्रेरणा मिळते. विद्यार्थ्यी जीवनातील यश पुढे आयुष्यभर निष्ठेने, जिद्दीने काम करण्याचे बळ पुरवते. पुढे हेच विद्यार्थी समाजासाठी, देशासाठी आपले योगदान देतात. 
या प्रसंगी आमदार तथा इन्फट जिसस सोसायटीचे अध्यक्ष सुभाष धोटे, शाळेचे संचालक अभिजित धोटे, सीबीएसई शाखेच्या मुख्याध्यापिका मंजुषा अलोने, स्टेट शाखेच्या मुख्याध्यापिका सिमरनकौर भंगू, मुख्याध्यापक रफिक अन्सारी, शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालकवर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक रफिक अन्सारी यांनी केले. संचालन संतोष सागर यांनी तर आभार प्रदर्शन नसिम शेख यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. 












About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top