Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थीनीचा सत्कार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
केतकी ढुमणे बारावीला तालुक्यातुन प्रथम; विज्ञान शाखेत 97 टक्के गुण आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स राजुरा - येथील जीवन विमा निगम चे विकास अधि...
  • केतकी ढुमणे बारावीला तालुक्यातुन प्रथम; विज्ञान शाखेत 97 टक्के गुण
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
येथील जीवन विमा निगम चे विकास अधिकारी किरण काशीनाथ ढुमणे यांची कन्या केतकी हिने नुकत्याच मूल्यमापन पद्धतीने जाहीर झालेल्या महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत राजुरा तालुक्यातुन 97% गुण प्राप्त करून प्रथम येण्याचा मान मिळविला त्याबद्दल माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी त्यांच्या घरी जाऊन केतकी चा सत्कार व केतकी सह कुटुंबियांचे अभिनंदन केले. 
केतकी हि मागील शैक्षणिक वर्षात शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय राजुरा येथे विज्ञान शाखेला शिक्षण घेत होती, त्याअगोदर दहावीमध्ये सुद्धा तिने चांगले गुण घेत प्राविण्य प्राप्त केले होते त्यानंतर अकरावीत तिच्या मध्ये असलेले शैक्षणिक कौशल्य नेहमी शिक्षकाना प्राविन्य प्राप्त विद्यार्थ्यांमध्ये असलेली चुणूक दाखवित होती. कोविड-१९ मुळे यावर्षी बारावीची परीक्षा न झाल्याने बोर्डाने अंतिम निकाल मूल्यमापन पद्धतीने जाहीर केला यात दहावी, अकरावी व बारावीच्या गुणांचे (अंतर्गत) मूल्यमापन करण्यात आले. यात केतकी किरण ढुमणे ही तालुक्यातुन प्रथम आली असून आपल्या यशाचे श्रेय आई-बाबा व संपूर्ण शिक्षकांना दिले.
याप्रसंगी माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्यासह आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव अविनाश जाधव, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष केशव ठाकरे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक कोंडलकर, वडील किरण ढुमणे इत्यादी उपस्थित होते. उपस्थितांनी केतकीचे अभिनंदन करून पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.













About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top