Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: ग्रामसेवक संघटनेचे पंचायत समिती जिवती येथे काळ्या फिती लाऊन धरणे आंदोलन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी गडचांदूर - ग्रामीण भागात शासनाच्या विविध योजना राबविणारा ग्रामसेवक हा ग्रामीण भागाच्या विकासाचा कणा...
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
ग्रामीण भागात शासनाच्या विविध योजना राबविणारा ग्रामसेवक हा ग्रामीण भागाच्या विकासाचा कणा आसून गाव विकासाची धुरा सांभाळून विकास कामात महत्वाची भूमिका बजावत असतो परंतु गाव गाड्याच्या राजकारणात नेहमी ग्रामसेवक भरडला जात असून त्यातूनच त्याला शिवीगाळ करणे मारहाण करणे धमक्या देने अपमानास्पद वागणूक देणे आसे प्रकार होत आहेत याचाच जाहीर निषेध म्हणून संघटनेच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्ष यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन तालुका शाखा जिवती यांच्या वतीने पंचायत समिती जिवती येथे संघटनेचे अध्यक्ष श्री लक्ष्मण मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली काळ्या फिती लाऊन धरणे आंदोलन करण्यात आले
वरोरा तालुक्यातील अटमुरडी ग्रामपंचायत चे ग्रामसेवक श्री गोपीचंद खानेकर या ग्रामसेवकाला ग्रामपंचायत मध्ये गावातील व्यक्ती कडून मारहाण करण्यात आली तेंव्हा संबंधीत आरोपी वर गुन्हा दाखल होऊन सुद्धा आरोपीला अटक करण्यात आली नाही या गंभीर घटनेच्या निषेधार्थ जिवती तालुका ग्रामसेवक संघटने कडून काळ्या फिती लाऊन निषेध नोंदविण्यात आला तसेच आरोपीला तात्काळ अटक करावी या मागणी साठी तालुका संघटनेच्या वतीने मा   गट विकास अधिकारी साहेब पंचायत समिती जिवती यांना निवेदन देण्यात आले यावेळी ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष श्री लक्ष्मण मिसाळ संघटनेचे सचिव श्री बाबाराव पोडे श्री संजय आत्राम श्री विनोद शेरकी श्री सचिन आदे श्री संजय ढोने श्री प्रकाश बोरचाटे श्री विजय पचारे श्री पुरुषोत्तम मिश्रा श्री प्रफुल गायकवाड श्री प्यारेलाल दहिवले कु शालू शेडमके कु स्मिता वऱ्हाडे श्री सुनील बांगरे श्री संजय आडे श्री अजय राऊत इत्यादी व इतर ग्रामसेवक बांधव मोठया संख्येने उपस्थित होते. 












About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top