Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: ब्रेकिंग न्यूज - अमलनाला ओव्हरफ्लो पाहण्याकरिता आलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
दोन लहान मुलांना वाचविण्याकरिता गेलेला युवक बुडाला मृतक चंद्रपूरचा  धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी गडचांदूर - गेल्या काही दिवसापूर...
  • दोन लहान मुलांना वाचविण्याकरिता गेलेला युवक बुडाला
  • मृतक चंद्रपूरचा 
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
गेल्या काही दिवसापूर्वी २-३ दिवस सतत आलेल्या मोठ्या पावसामुळे अमल नाला बांध पाण्याने पूर्णपणे भरून ओव्हरफ्लो झाले आहे. ओव्हरफ्लो पाहण्याकरिता जिल्ह्यातून दररोज शेकडो जण येत आहेत त्यामुळे अमलनाला परिसरात पर्यटकांची वाढती संख्या बघता लोकांच्या सुरक्षेकरिता पोलिस बंदोबस्त ही लावण्यात आले होते. आज रविवारची सुट्टी असल्यामुळे हजारोच्या संख्येने पर्यटक अमलनाला येथे फिरायला आले होते. आज दुपारी ४ वाजताच्या दरम्यान एका व्यक्तीचे ओव्हरफ्लोच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार चंद्रपूर येथील काही मित्र नातेवाईकसह अमलनाला येथे पाण्याचा आनंद लुटण्यासाठी आले होते. अचानक दोन लहान मुले पाण्यात बुडाल्याची आरडाओरड सुरू झाली. त्यांना वाचवण्याकरिता अनेक जण यांच्याकडे धाव घेतली असता चंद्रपूर येथील एका युवकाने ही त्यांना वाचवण्याकरीता पाण्यात उतरला होता. पण पाणी खोल असल्यामुळे तो खोल पाण्यात बुडाल्याची माहिती मिळाली आहे. मृतक युवकाचे नाव गोलू चट्टे वय २४ रा. विठ्ठल मंदिर वॉर्ड, चंद्रपूर असे आहे. लोकांच्या सहाय्याने त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आले. पोलिसांनी पंचनाम्याची कारवाई सुरू केले आहे. 










About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top