Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: विराआंस चे नागपूरात ९ आँगस्टपासून ठिय्या आंदोलन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
चंद्रपूर जिल्ह्यातून हजार कार्यकर्ते सहभागी होणार विरेन्द्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी राजुरा - स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करावे, कोर...
  • चंद्रपूर जिल्ह्यातून हजार कार्यकर्ते सहभागी होणार

विरेन्द्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा -
स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करावे, कोरोना काळातील वीज बील राज्य सरकारने भरावे, पेट्रोल - डिझेल - गँस दरवाढ त्वरीत मागे घ्यावी या प्रमुख मागण्यांसाठी विदर्भ राज्य आंदोलन समिती तर्फे दिनांक 8 आँगस्ट, रोज सोमवारला क्रांती दिनापासुन विदर्भस्तरीय "बेमुदत ठिय्या आंदोलन" शहीद चौक, इतवारी नागपूर येथे सुरू होत आहे. संपुर्ण विदर्भातून व नागपूर शहरातून हजारोंच्या संख्येने या आंदोलनात सामील होणार आहेत. या आंदोलनात चंद्रपूर जिल्ह्यातून एक हजार विदर्भवादी कार्यकर्ते सहभागी होणार आहेत, अशी माहिती विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष अँड.वामनराव चटप यांनी दिली आहे. 
नागपूर येथे दिनांक 9 ऑगस्ट ला दुपारी १२-०० वाजता विदर्भ चंडिका मातेची महाआरती करून विदर्भ स्तरीय ठिय्या आंदोलनाला सुरुवात होणार आहे. स्वतंत्र विदर्भ झाला तरच येथील लोकांचा विकास होऊ शकतो, बेरोजगारांना नोकरी मिळू शकते, शेतकरी, कष्टकरी, व्यावसायिक यांना न्याय मिळू शकतो याविषयी आता जनतेला विश्वास वाटत आहे. त्यामुळेच तरुण, विद्यार्थी, महिला, नागरिक, नोकरवर्ग, व्यापारी, शेतकरी या सर्वांचा या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे. या आंदोलनात विदर्भातील सर्व जिल्ह्यातून नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. 
या विदर्भाच्या लोकांच्या हक्क आणि न्यायासाठी होणार्‍या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते माजी आमदार अँड.वामनराव चटप, जिल्हाध्यक्ष किशोर दहिकर, किशोर पोतनवार, मनोहर गेडाम, अंकुश वाघमारे, मितीन भागवत, कपिल इद्दे, वैशाली कटलावार, प्रणिता जुनघरे, अनिता डोंगरे, सौ.उराडे, कोअर कमिटी सदस्य अँड.मोरेश्वरराव टेमूर्डे, हिराचंद बोरकुटे, रमेश राजुरकर, पराग गुंडेवार, सुदाम राठोड, योगेश मुरेकर, सुधीर सातपुते, प्रशांत ढवळे, मुन्ना आवळे, श्री.सहारे, जयदेव मून, नरेंद्र बंडे, सुधाकर जिवतोडे, सचिन सरपटवार, नथमल सोनी, अरुण वासलवार, अरविंद चव्हाण, सतीश पवार, विकास बोरकर, गिरीधरसिंह बैस, गोपाळ रायपुरे, कवडू येनप्रेडीवार, नरेंद्र काकडे, रमाकांत मालेकर, अनिल दिकोंडवार, गोपी मित्रा, मधुकर चौधरी, सचिन मेश्राम योगेश नंदनवार, गीता मेश्राम, ईश्वर चहारे, अविनाश उके, प्रदीप सोयाम, सुनील राठोड, विनोद पवार या चंद्रपूर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी केले आहे.










About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top