Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: सेवानिवृत्त आदर्श शिक्षक महादेव अवताडे यांचे दु:खद निधन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी गडचांदूर - सेवानिवृत्त आदर्श शिक्षक काँग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते महादेव काशीनाथ अवताडे (वय 69) यांचे...
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
सेवानिवृत्त आदर्श शिक्षक काँग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते महादेव काशीनाथ अवताडे (वय 69) यांचे दिनांक 23/08/2021 रोजी सकाळी 8:45 ला दीर्घ आजाराने आवाळपुर येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, दोन मुली असा बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्या निधनाने परिसरात शोकेची लाट पसरली आहे. त्यांनी आवारपूर येथील जवाहरलाल नेहरू विद्यालयात पर्यवेक्षक म्हणून दीर्घ सेवा दिली होती. आपल्या प्रेमळ व शांत स्वभावाने त्यांनी मोठी ख्याती कमावली होती. त्यांची अंतिम यात्रा त्यांच्या अवारपूर् येथील राहत्या घरून दुपारी 3 वा. निघेल असे समजले आहे. 







About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top