- पुन्हा तिसऱ्यांदा होणार सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत फेरचौकशी
- तहसीलदार, मंडळ अधिकारी व तलाठी यांचे धाबे दणाणले
- कोरपना तालुक्यात अवैध रेती तस्कराचा बोलबाला
- चर्चित अवैध गौण खनिज प्रकरण
गडचांदूर -
कोरपना तालुक्यातील गडचांदूर येथील अवैध गौण खनिज व रेती तस्करांना तहसीलदार यांची साथ मिळाली आहे. केटीसी लॉजिस्टिक्स कंपनी प्रकरणात खनीज चोरीची सखोल चौकशी व्हावी असे प्रसारमाध्यमांवर बातम्या धडकताच घाबरलेल्या तहसीलदाराने लाखोंचा महसूल गोळा करुन कारवाई केल्याची प्रेसनोट जाहीर करून स्वतःला स्वच्छ दाखवण्याचे प्रयत्न करीत आहे. दुसरीकडे गडचांदूर येथील अवैध गौण खनिज १७ ब्रासवरुन ७८ ब्रास झाल्याने बातमीमुळे आता तहसीलदारांचे सेटिंग विस्कटल्याचे चर्चा सुरु असून मंडळ अधिकारी तलाठी व तहसीलदार यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. या प्रकरणाची चर्चा आता तहसीलमध्ये नव्हे तर पूर्ण चंद्रपूर जिल्हात प्रकरण गाजत आहे.
कामगार संघाचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते विजय ठाकरे यांनी आक्षेप नोंदवत दुसऱ्यांदा तक्रार करून खनिज चोरीची सखोल चौकशी करा अशा आशयाचे वृत्त धडकताच महसूल अधिकाऱ्यांचे सेटिंग विस्कटलले आणि प्रशासनाच्या कार्यप्रणालीवरही मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. महसूल प्रशासनाने दि.१३ आगस्ट ला त्याच प्रकणाची दुसऱ्यांदा मोका पंचनामा केलेल्या अवहवालात १७ ब्रास ऐवजी आता ७८ ब्रास पर्यत दाखविले असल्याने तालुका महसूल प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली असून आता वरील ५९ ब्रास गौण खनिज साठा आला कुठून असा प्रश्न पडला आहे.
चौकशी दरम्यान उपस्थित होणारे प्रश्न व प्रसारमाध्यमांच्या बातम्यांनी प्रशासनाची झोप उडवली असून तहसीलदार महेंद्र वाकलेकर यांच्या आदेशानुसार तलाठी व मंडळ अधिकारी यांनी थुट्रा येथील स्थित सर्व्ह नंबर ५५/३,क्षेत्र १२६ आर वर्ग मीटर या ठिकाणी मोक्यावर जाऊन चौकशी केली असता मोजमापी करून ३० ब्रास बोल्डर,१५ ब्रास अडीच इंची गिट्टी,८ ब्रास एक इंची गिट्टी, १५ ब्रास लाल मुरूम आणि १० ब्रास चुरी, अशा एकूण ७८ ब्रास गौण खनिज मोक्यावर विना परवाना वापरण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पुन्हा फेरचौकशी होणार असल्याची माहिती
तहसिलदार महेंद्र वाकलेकार यांनी आता तिसऱ्यांदा पुन्हा पंचनामा पीडब्ल्यूडी मार्फत करण्यात येईल असे सांगितले आहे. वादग्रस्त ट्रांसपोर्ट कंपनीवर दंडनीय व इतर कार्यवाही पासून वाचविन्यासाठी पडद्या मागुन केविलवाना प्रयत्न आहे कि काय अशी चर्चा जनमानसांत सुरु आहे. चौकशीअंती जप्त केलेला माल तहसीलदार हे गैरअर्जदार ह्यांना वापराची सूट देतात तर वारंवार चौकशी करून ते आपल्याच विभागाचे तलाठी व मंडल अधिकारी यांच्यावर अविश्वास तर दाखवीत तर नाही आहे ना असाही प्रश्न आता निर्माण झाला आहे. पुढील पंचनामा जर पिडब्ल्यूडी मार्फत होत असेल तर खोदकाम करणाऱ्या जेसीबी मशीन द्वारे वादग्रस्त डीजल पंप चा सम्पूर्ण ३० हजार चौ फुट चा परिसर खोदून काढावा लागेल हे निश्चित अन्यथा केलेली कार्यवाही ही फक्त केटीसी कंपनीला वाचविन्यासाठीच करण्यात आली असल्याचे सिद्ध होणार असल्याचा आरोप तक्रारकर्त्यांनी केला आहे.
तालुक्यात अवैद्य रेती तस्करांचा बोलबाला
ट्रैक्टर चा दंड १,११,०००/- हायवा ट्रक चा दंड २,५०,०००/- जेसीबी / पोकलेन चा दंड ८,००,००० /- ह्या प्रमाणे जर दंडनीय कार्यवाही झाली तर कुबेराचे धना सारखे दंड वसूल झाले असते. एक गरीब शेतकरी शेती उपयोगासाठी ट्रैक्टर घेतो, शेती काम झाल्यानंतर कर्ज़ा चे हप्ते चुकविन्यासाठी रेती-गिट्टी-मुरुम इत्यादीचे तो भाड़े मारतो अश्या गोर-गरीब स्थानिक बेरोजगाराच्या वाहनावर कार्यवाही करून आपली पाठ हे अधिकारी थोपवित असतात. मात्र असे मोठे मासे हाती लागल्यावर यांच्यावर नाममात्र कारवाई करायची तर अशा कार्रवाहीला काय म्हणायचे ? मोठ्या गुंतवणूकदारांची गाड़ी अथवा लोडिंग मशीन पकडल्या जाते तेव्हा मोठी देवान घेवान होते. कारण दंड झाला तर २५०००० किव्हा मशीन असेल तर ८०००००/- म्हणून ५००००/- हजार ते १००००० /- रुपये चिरिमिरी घेउन सेटिंग करतात आणि मग महसूली तूट भरून काढण्यासाठी लहान सहान ट्रैक्टर चालक कडून दंड वसूल करतात हा न्याय आहे की अन्याय असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केल्या जात आहे.
अजूनपर्यंत या प्रकरणात कोणतेच दंड आकारण्यात आलेले नाही आहे. दुसऱ्यांदा केलेल्या पंचनाम्यात 17 ब्रास खानिज 78 ब्रास आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मोजणी करून पुन्हा पंचनामा करण्यात येईल.











टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.