Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: चंद्रपूरातील "मयूर एजन्सी" कडून ग्राहकाची फसवणूक
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
गडचांदूरातील डोहे यांना आलेला अनुभव गडचांदूर - गडचांदूर येथील नगरसेवक प्रतिष्ठित व्यक्ती अरविंद डोहे यांचा मुलगा वैभव अरविंद डोहे यांनी ११ आ...
  • गडचांदूरातील डोहे यांना आलेला अनुभव
गडचांदूर -
गडचांदूर येथील नगरसेवक प्रतिष्ठित व्यक्ती अरविंद डोहे यांचा मुलगा वैभव अरविंद डोहे यांनी ११ आगस्ट २०२१ रोजी चंद्रपूर येथील नामवंत प्रतिष्ठान "मे. मयुर एजन्सी" कडून पॅनासोनिक कंपनीची ५८ इंच टिव्ही किंमत ४९ हजार रुपयात खरेदी केला. दुकानातील प्रतीक नामक सेल्समॅन यांनी डेमो देताना स्मार्ट टिव्ही आहे यामध्ये बरेच फंक्शन असल्याचे सांगीतले. त्याच्यावर विश्वास ठेवून वैभव यांनी टिव्ही खरेदी केला. दुसऱ्या दिवशी सदर कंपनीचा टेक्निशियन वैभवच्या घरी गडचांदूर येथे आला असता "सदरची टिव्ही ही स्मार्ट नसून साधी असल्याचे सांगीतले" तेव्हा डोहेंना धक्काच बसला. सदर दिलेली टिव्ही फार जूनी असून टिव्ही मॅनेफॅक्शनची पट्टी काढलेली होती. त्यांनी दिलेल्या बिलावर टिव्ही साधी, स्मार्ट की एंड्राईड असे काहीही नमुद केलेले नाही आणि टिव्हीचा सिरीयल नंबर सुध्दा टाकण्यात आलेला नाही.
तेव्हा मे.मयुर एजन्सीच्या दुकान मालकाला अरविंद डोहे यांनी फोन करून विचारना केली. तेव्हा सुध्दा ते खोटे बोलत होते. ही स्मार्ट टिव्ही आहे, मी तुमच्या मुलाला सांगूनच दिले आहे. तेव्हा अरविंद डोहे यांनी विनंती केली की ही टिव्ही परत घ्या व मला दुसरी टिव्ही द्या, वरील रक्कम मी देण्यास तयार आहो अशी विनंती केली. परंतू ते काहीही ऐकायला तयार नव्हते. टिव्ही परत घेणार नाही या भुमीकेवर ते ठाम असल्याने अखेर अरविंद डोहे यांनी स्वतः किरायाने गाडी करून सदर टिव्ही त्यांच्या दुकानात नेऊन ठेवले. तेव्हा पण दुकानदाराने टिव्ही उचला विकलेला माल परत होत नाही. असे म्हणताच दोघांत चांगलाच वाद झाला व अरविंद डोहे यांनी आपली भुमीका ठाम ठेवून टिव्ही बदलवून घेतल्या शिवाय परत जाणार नाही. अशी भूमिका घेतल्याने दुकानदाराचे धाबे दणाणले व ती टिव्ही परत घेवून दुसरी दिली. यासर्व घडामोडी मुळे डोहे यांना मोठ्याप्रमाणात आर्थिक मानसिक त्रास सहन करावा लागला. सदर दुकानदारांनी अशाप्रकारे कित्येक ग्राहकांची फसवणूक केली असेल! हा मात्र संशोधनाचा विषय बनला आहे. 











About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top