- शिवसेना जिल्हा प्रमुख संदीपभाऊ गिऱ्हे यांच्या मार्गदर्शनात व शिवसेना राजुरा विधानसभा समन्वयक बबनभाऊ उरकुडे यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात शिवसंपर्क अभियान जोमाने सुरु
राजुरा -
हिंदुहृदय सम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण राज्यात शिवसंपर्क अभियान जोमाने सुरु आहे. राजुरा तालुक्यातील साखरी येथे झालेल्या संपर्क अभियानात असंख्य युवा कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. शिवसेनेत प्रवेश घेणाऱ्या सर्व युवकांचे शिवसेना राजुरा विधानसभा समन्वयक बबनभाऊ उरकुडे यांनी शिवबंधन बांधून स्वागत केले.
प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांमध्ये राकेश भोंगळे, सचिन निमकर, हर्षल निमकर, प्रजोत कुडवेकर, शुभम खुजे, शुभम टिपले, पीयुष टिपले, सुनील नगराळे, गरीब करदोडे, वैभव गालफाडे, रितेश त्रिशूलवार, रोशन गालफाडे, राहुल काळे, छोटू वांढरे, अमोल डेरकर, दुर्गेशवर लांडे, अर्जुंन बेसुरवर, अमित निमकर, मोरेश्वर मिलमले, हरिदास चौधरी, प्रदीप खुजे, प्रदीप आस्वले आदींचा सत्कार करून शिवसेना पक्षात पक्षप्रवेश करण्यात आला.
यावेळी युवासेना तालुका प्रमुख बंटी मालेकर, शिवसेना उपतालुका रमेश झाडे, गोवरीच्या सरपंच आशाताई उरकुडे, आर्वी गावचे ग्रापं सदस्य बंडू आईलवार, आर्वी गावचे कार्यकर्ते प्रशांत महाकुळकर, गणेश चोथले, साखरीचे कट्टर कार्यकर्ते प्रवीण मोरे, पाढरपोनीचे शाखाप्रमुख सूर्यभान मोरे यांच्यासह शिवसेना, युवासेनेचे विविध पदाधिकारी व गावातील नागरिक उपस्थित होते.
शिवसेना जिल्हा प्रमुख संदीपभाऊ गिऱ्हे यांच्या मार्गदर्शनात व शिवसेना राजुरा विधानसभा समन्वयक बबन उरकुडे यांच्या नेतृत्वात ग्रामीण परिसरात व जिल्ह्यातील राजकारणातही शिवसेना भक्कमपणे प्रस्थापित होत आहे. सद्यस्थितीत अन्य पक्ष हतबल, थंड किंवा निस्तेज, निष्प्रभ झालेले दिसत असून मात्र बबनभाऊचा जनाधार वाढताना मात्र दिसत आहे.












टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.