Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: अखेर 'त्या' मृतकाच्या पत्नीला स्थायी नौकरी आणि 18 लाखची आर्थिक मदत देण्यावर सहमती
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अल्ट्राटेक सिमेंट कंपनीत शॉक लागून कामगाराचा झाला होता मृत्यू कामगार मृत्यू प्रकरण : सुरक्षा विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह धनराजसिंह ...
  • अल्ट्राटेक सिमेंट कंपनीत शॉक लागून कामगाराचा झाला होता मृत्यू
  • कामगार मृत्यू प्रकरण : सुरक्षा विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
अल्ट्राटेक सिमेंट कंपनी आवारपूर येथील ए.जे. इलेक्ट्रिकल मध्ये कार्यरत असलेल्या युवक सुरेंद्र शरद अवगाण वय ३५ वर्ष रा. नांदा याचा कामावर विद्युत शॉक लागल्यामुळे उपचारा दरम्यान चंद्रपूर येथे मृत्यू झाला होता. या घटनेने अल्ट्राटेक येथे कामगार सुरक्षा विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
15 ऑगस्ट च्या पूर्व संध्येला झालेल्या या घटनेमुळे अवारपुर सिमेंट कंपनी मधील कामगार ववर्गात तसेच अधिकारी वर्गात तणाव निर्माण झाला होता. एल अँड टी सिमेंट कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष शिवचंद्र काळे, साईनाथ बूच्चे यांनी आपल्या कामगार पदाधिकाऱ्यांसोबत एडीएम ऑफिस मध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत मृतक कामगाराच्या परिवाराला आर्थिक मदत मिळवण्याकरिता चर्चा करत होते तर मेन गेट वर विजय क्रांती कामगार कामगार संघटनेची अध्यक्ष शिवानी वडेट्टीवार यांच्या मार्गदर्शनाखाली सचिव सुनील ढवस व यांच्या सहयोगी पदाधिकारी मृतक कामगाराच्या परिवाराला आर्थिक मदत आणि मृतकच्या पत्नीला स्थायी नोकरी देण्याची मागणी करत शेकडो कामगारांसोबत नांदा फाटा वरील मेन गेट रोखून धरले होते. शेवटी कामगारांच्या दबावाला यश मिळाले. रात्री 12 ते सकाळी 4 वाजेपर्यंत झालेल्या मैराथान बैठकीत अल्ट्राटेक प्रबंधन तर्फे मृतक कामगाराच्या परिवाराला आर्थिक सुहनुभुती राशी स्वरूपात रू. 18 लाख आणि मृतक व्यक्तीच्या पत्नीला प्रथम 2 वर्ष ट्रेनिंग देऊन कंपनीत योग्यतेनुसार स्थायी नौकरी देण्यावर सहमती झाली.
रात्री 12 पासून तर सकाळी 4 वाजेपर्यंत चाललेल्या बैठकीत अल्ट्राटेक प्रशासन तर्फे युनिट हेड पी. श्रीराम, एचआर प्रमुख संजय शर्मा, टेक. प्लांट हेड  संदीप देशमुख, आनंद पाठक, पोलीस उपविभागीय अधिकारी सुशिल कुमार नायक, ठाणेदार गोपाल भारती, एपीआई प्रमोद शिंदे, कामगार संघटनेतर्फे शिवचंद्र काळे, साईनाथ बुच्चे, मदन सिंह चंदेल, भीवगडे, पांडे, विजय क्रांती कंत्राटी कामगार संघटने तर्फे सुनील ढवस, हरिदास मोरे, हरी पूनवकटकर आदी उपस्थित होते. 










About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top