- अल्ट्राटेक सिमेंट कंपनीतील घटना
गडचांदूर -
विजेचा शॉक लागल्याने सुरेंद्र शरदराव अवघान वय 33 रा. नांदा या कामगाराचा मृत्यू झाला. मृतक सुरेंद्र अवघान हा अल्ट्राटेक सिमेंट कंपनीतील एजे इलेक्ट्रिकल कंपनी मध्ये सीपीपीला कार्यरत होता. आज सायंकाळी सुमारे 5 वाजताच्या दरम्यान कंपनीत काम करीत असतांना त्याला विजेचा जबर शॉक लागला. शॉक लागताच त्याला दवाखान्यात नेण्यात आले. तिथून त्याला चंद्रपूर रेफर करण्यात आले मात्र तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृतकाच्या मागे पत्नी, 3 व 6 वर्षीय 2 मुली आहेत. घटनेची माहिती मिळताच कामगार नेते शिवचन्द्र काळे यांनी मृतक कामगाराच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी याकरिता कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी मागणी केली आहे आताही एडीएम बिल्डिंगमध्ये चर्चा सुरु असल्याचे समजले आहे.











टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.