Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: नोंदणी केली नसल्यास मूर्तिकारांवर दंडात्मक कार्यवाही
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी चंद्रपूर - गणेशोत्सवात मातीच्या मूर्ती विक्री करणाऱ्या मूर्तीकारांनी चंद्रपूर शहर महानगरपालिकेकडे नोंदणी क...
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
गणेशोत्सवात मातीच्या मूर्ती विक्री करणाऱ्या मूर्तीकारांनी चंद्रपूर शहर महानगरपालिकेकडे नोंदणी कराव्यात, अशा सूचना मागील १५ दिवसापूर्वी देण्यात आल्या होत्या. तरीही चंद्रपूर शहरामध्ये अनेक मूर्तिकारांनी महानगरपालिकेकडे नोंदणी न करता मूर्ती विक्रीचा व्यवसाय करीत असल्याचे आढळून येत आहे. मनपाच्या पथकाद्वारे तपासणी मोहीम सुरु करण्यात आली असून, नोंदणी आढळून न आल्यास मूर्तिकारांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात येणार आहे.  
चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या हद्दीत मूर्ती विक्री करणाऱ्या सर्व मूर्तिकारांची नोंदणी करण्यात येत आहे. नोंदणीसाठी झोननिहाय मुख्य स्वच्छता निरीक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. मूर्ती विक्रीच्या ठिकाणी नोंदणी प्रमाणपत्र दर्शनी भागात लावणे अनिवार्य आहे. मात्र, नोंदणी न करता काहीजण मूर्ती विकताना दिसत आहेत. अशांवर सक्त कारवाई सुरु करण्यात आली आहे. 
केंद्र शासनाने श्रीगणेशाच्या पीओपी मूर्तींवर बंदी जाहीर केलेली आहे. त्यानुसार चंद्रपूर शहरामध्ये पीओपी मूर्तींची निर्मिती, आयात, साठा व विक्री होऊ नये, यासाठी कडक अंमलबजावणी होणार आहे. गणेश मूर्तीच्या दुकानात पीओपी मूर्ती आढळल्यास १० हजारांचा दंड, दुकाने सील, डिपॉझिट जप्त आणि दोन वर्षे बंदीसह प्रदूषण नियंत्रण कायद्यानुसार फौजदारी कारवाई केली जाणार आहे. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top