Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायद्यांतर्गत 26 पानठेल्यांवर कारवाई
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अपर जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वात धडक मोहीम शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी चंद्रपूर - राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत अपर जि...
  • अपर जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वात धडक मोहीम
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांच्या मार्गदर्शनात 26 पानठेल्यांवर कारवाई करण्यात आली. कोटपा कायदा 2003 ची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने चंद्रपूर शहर पोलिस स्टेशनच्या हद्दीत ही मोहीम राबविण्यात आली.
जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर अंतर्गत आरोग्य विभाग, अन्न व औषध प्रशासन विभाग तसेच पोलीस विभागामार्फत शासकीय कार्यालये, हॉस्पिटल, शाळा परिसरातील पानठेल्यावर सदर कार्यवाही करण्यात आली आहे. जास्तीत जास्त लोकांना तंबाखुमूळे होणाऱ्या दुष्परिणामाची माहिती व जाणीव होईल. तसेच नवीन पिढी तंबाखूच्या आहारी जाणार नाही, हा उद्देश सफल होईल. कोटपा कायदा 2003 ची अंमलबजावणी तसेच जास्तीत जास्त लोकांना यांच्या दुष्परिणामाची जाणीव होणे हासुध्दा या कारवाईचा उद्देश आहे. यावेळी “करा तंबाखू, सिगारेट, जर्दा याला नकार, करा सुदृढ आरोग्याचा स्वीकार” हा कानमंत्र देण्यात आला. 
सदर कार्यवाहीमध्ये जिल्हा तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या जिल्हा सल्लागार डॉ. श्वेता सावलीकर, अन्न निरीक्षक श्री. सातकर, पोलीस निरीक्षक श्री. अंभोरे, पोलीस उपनिरीक्षक श्री. चव्हाण तसेच राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत येणारे समुपदेशक मित्रंजय निरंजने, सामाजिक कार्यकर्ता तुषार रायपुरे, अतुल शेंद्रे, दुर्गाप्रसाद बनकर यांनी मोलाची कामगिरी केली. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top