Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: माणिकगड सिमेंट कंपनी वर व्यवसायिक आधारावर टॅक्स लावावा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शरद जोगी याची मागणी धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी गडचांदूर - येथील माणिकगड सिमेंट कंपनी आताची अल्ट्राटेक सिमेंट ही 1984-85 पासून ...
  • शरद जोगी याची मागणी
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
येथील माणिकगड सिमेंट कंपनी आताची अल्ट्राटेक सिमेंट ही 1984-85 पासून येथे कार्यरत आहे. हया कंपनीचा पूर्ण परिसर गडचांदुर शहराचा एक वॉर्डात येते. कंपनी निर्मिती पासून कंपनीने हे शहर दत्तक घेतले आहे पण शहराच्या विकासात कंपनीचे योगदान मात्र शून्यच आहे. प्रत्येक कंपनी आपल्या सीएसआर फंडातून आपल्या जवळपास असलेल्या गावांचा विकास करत असते. पण आतापर्यंत कंपनीतील अधिकरियांनी स्थानीय नेत्यांना चहा पाणी पाजून त्यांना खुश ठेवत होते. वास्तविक पाहता कंपनी ने आपल्या करोडो रुपयांचा सीएसआर फंड गड चांदूर शहराच्या विकासा साठी खर्च करायला पाहिजे. ज्यातून येथील नागरिकांना रोड, नाली, शिक्षण, आरोग्य या सारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता खर्च करायला पाहिजे. परुंतू असे काही होताना दिसत नाही आहे. कंपनी चे उद्योग परिसर वगळता कंपनी वर उद्योग नुसार टॅक्स लावला पाहिजे व कंपनी चे रहिवास परिसराचे पुनर्मूल्यांकन करून शहराच्या नगरपरिषद नियमा नुसार टॅक्स लावला गेला पाहिजे. कंपनी नेहमी आज पर्यंत ग्रामपंचयत सदस्य यांना बोलून त्यांना पार्टी देऊन फक्त सतरालाख एक मुस्त रक्कम देऊन टॅक्स भारत होती. आता नगरपरिषद होऊन ही तीच प्रक्रिया कंपनी ची सुरू आहे .आता टॅक्स भराच्या वेळेस नगरपरिषद पदाधिकारी यांना बोलाऊन तीच प्रक्रिया होणार अशी चर्चा सुरू असून कंपनी ची तीन ते चार करोड टॅक्स नगरपरिषद ला द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष व नगरपरिषद चे उपाध्यक्ष शरद जोगी यांनी केली आहे. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top