Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: कोरपना येथे अन्य धान्य किटचे वाटप
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शैलेश कोरांगे - आमचा विदर्भ प्रतिनिधी कोरपना - महारोगी सेवा समिती आनंदवन वरोरा, नाभिक टायगर सेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने नाभिक समाजात...
शैलेश कोरांगे - आमचा विदर्भ प्रतिनिधी
कोरपना -
महारोगी सेवा समिती आनंदवन वरोरा, नाभिक टायगर सेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने नाभिक समाजातील गरजू व्यक्तींना अन्नधान्य किटचे वाटप कोरपना येथे करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाभिक टायगर सेनेचे अध्यक्ष संतोष कुरमेलवार, प्रमुख मार्गदर्शक म्हणून रवींद्र नलगंटीवार, प्रमुख पाहुणे म्हणून विक्रम पटेल, शोबत खान, उमेश घुलसे, अविनाश कुलसंगे, जनसेवा पक्षाचे जिल्हा सचिव रमेश घुमे, दिलीप राजूरकर,  रमेश जमदाडे, सुरेश खोबरकर, राजू आंबेकर आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी सत्तर अन्नधान्य किटचे  वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिवाकर वडस्कर, संचालन भोलेश दुर्लावार तर आभार पांडुरंग उंबरकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुरज खोबरकर, किशोर बनसोड, संदिप हनुमंते, रवींद्र नानगिरवार, दिनेश गडकर, भारत पंदीलवार, नथ्थु चौधरी, प्रफुल नक्षणे, सचिन पंदीलवार, प्रथमेश खोबरकर, मारोती मांडवकर, अनिल आंबेकर, संतोष नासनुकर, त्रिशूल खोबरकर आदींनी सहकार्य केले. 










About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top