Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: जिल्ह्यातील आदिम कोलामांच्या प्रश्नांना प्राधान्यक्रमाने सोडविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
कोलामांच्या आंदोलनाला मोठे यश : अँड. वामनराव चटप व विकास कुंभारे यांचा पाठपुरावा शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी चंद्रपूर - स्वातंत्र्यदिन...
  • कोलामांच्या आंदोलनाला मोठे यश : अँड. वामनराव चटप व विकास कुंभारे यांचा पाठपुरावा
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
स्वातंत्र्यदिनी घोडणकप्पी या आदिम वस्तीला रस्त्याने जोडण्याचे अभिनव आंदोलन केल्यानंतर कोलामांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आज (ता.२४) जिल्हाधिकाऱ्यांनी विस कलमी सभागृहात अधिकारी व कोलाम विकास फाऊंडेशनचे पदाधिकारी यांची संयुक्त बैठक बोलाविली व जिल्ह्यातील कोलामांच्या सर्व वस्त्या रस्त्याने जोडून, पिण्याचे पाणि व अन्य समस्या प्राधान्यक्रमाने सोडविण्याचे आश्वासन चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांनी दिले.
कोलाम विकास फाऊंडेशन या संस्थेने जिवती तालुक्यातील घोडणकप्पी या आदिम वस्तीवर स्वातंत्र्यदिनी रस्ता निर्माणीचे अभिनव आंदोलन केले होते. या आंदोलनात अनेक स्वयंसेवी संस्था व हजारो कोलाम बांधव सहभागी झालेे. यामुळे जिल्ह्यातील कोलाम वस्तींची दुरावस्था उघडकीस आली. या आंदोलनाची दखल घेऊन जिल्हा प्रशासनाने संबंधीत विभागाचे अधिकारी व कोलाम विकास फाऊंडेशनचे पदाधिकारी यांची संयुक्त बैठक बोलावून कोलामांचे वैयक्तिक व वस्त्यांवरील समस्यांची सविस्तर चर्चा घडवून आणली. यात माणिकगड पहाडावरील मुळ रहीवासी असलेल्या कोलामांना वनजमीनीचे पट्टे देतांना पुराव्याची अट शिथील करण्यात आली. याशिवाय, कोलामांना घरकुल योजनेचा लाभ, विविध विषयांचे प्रशिक्षण, सामाजिक सभाग्रुह, वाचनालय, खावटीचे वाटप यासह रस्ते व पाणि आदि सोयी सुविधा तातडीने बहाल करण्याचे निदेश संबंधीत विभागांच्या अधिकाऱ्यांना दिले.
या बैठकीला आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी घुगे साहेब यांचेसह बांधकाम, वन, पाणि पुरवठा व अन्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. माजी आमदार अँड. वामनराव चटप, कोलाम विकास फाऊंडेशनचे अध्यक्ष विकास कुंभारे, नानाजी मडावी, मारोती सिडाम हे पदाधिकारी उपस्थित होते.

आदिमच्या योजनेत गैरव्यवहार करणाऱ्यांना कठोर शासन होणार
अनेक कोलामगुड्यांवर कोलामांच्या निरक्षरतेचा गैरफायदा घेऊन घरकुल व विहीर बांधकामात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केलेला आढळून येतो. यातील अनेक प्रकरणांची तपासणी करून कोलामांसाठी असलेल्या योजनांचा निधी हडपल्याचे तथ्ये उघडकीस आले आहे. अजुनही अनेक घरकुलांची व विहीर बांधकामाची तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे संकेत जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. 







About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top