- कोविड लसीकरण साठी 50000 ए.डी. सिरींजची केली मदत
गडचांदूर -
संपूर्ण देशामध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कोविड लसीकरणाचे कार्य चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुरू आहे. परंतु ए डी. सिरिंजची कमी जाणवत असल्याने लसीकरणात अडचण येत आहे. सिरींजचा तुळवडा बघता स्थानीय जनतेच्या आरोग्याचे संज्ञान घेऊन स्वतः पुढाकार घेत प्राथमिक आरोग्यकेंद्र नारंडा अंतर्गत येणाऱ्या डालमिया सिमेंट कंपनीच्या सामाजिक कार्य करणारी भारत फाउंडेशनच्या वतीने चंद्रपूर जिल्ह्याकरिता ५०,००० ए. . सिरिंजची मदत मा.जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जिल्हा खनन अधिकारी मा.श्री.सुरेश नैताम, जिल्हा उपआरोग्य अधिकारी मा. श्री.संदीप गेडाम यांच्याकडे सुपुर्द करण्यात आली. या मदतीमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील ५०,००० नागरिकांना कोविड वॅक्सिनेशनचा लाभ घेता येणार आहे. दालमिया सिमेंट कंपनीचे एकझिक्युटिव डायरेक्टर मा. हक्कीमुद्दीन अली यांच्या मार्गदर्शनाखाली ए. डी. सिरिंज चे वाटप करण्यात आले. यावेळी कंपनीचे युनिट हेड मा. सुनीलकुमार भुसारी, वरिष्ठ प्रबंधक हरिगोविंद मीना, अरविंद ठाकूर हे उपस्थित होते.
या उपक्रमाची सर्वत्र प्रशंसा होत असून बाकी जिल्ह्यातील इतरही उद्योजकांनी दालमिया सिमेंट कंपनीचे अनुसरण देशातून कोरोनाला हद्दपार करण्याकरिता सहकार्य केले पाहिजे अशी मागणी होऊ लागली आहे.











टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.