- महा आवास अभियान ग्रामीण अंतर्गत जिल्हा स्तरावरून सर्वोत्कृष्ट ग्राम पंचायतची निवड
- 15 ऑगस्ट ला पालकमंत्री यांचे शुभहस्ते दिले जाणार पुरस्कार
गडचांदूर -
गडचांदुर महाआवास अभियान ग्रामीण अंतर्गत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रम निहाय प्रगतीनुसार गुणांकना प्रमाणे प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामिण) तसेच राज्यपुरस्कृत आवास योजना अंतर्गत चंद्रपूर जिल्हा स्तरावरुन सर्वोकृष्ठ ग्राम पंचायतचा तृतीय क्रमांक कोरपना तालुक्यातील "स्मार्ट विलेज" च्या नावाने विख्यात असलेले बिबी आणि पीपरी ग्राम पंचायतीची निवड करण्यात आली आहे. सदर पुरस्काराची घोषणा गट विकास अधिकारी, पंचायत समिती कोरपना ने एका पत्राद्वारे केली आहे.
सदर पुरस्कार शासन निर्णाय प्रमाणे जिल्हास्तरावर पुरस्कार वितरण चंद्रपूरचे मा. पालकमंत्री श्री विजय वडेटटीवार यांचे शुभहस्ते दिनांक 15 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 9:00 वा जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपुर येथे आयोजित पारितोषीक वितरण समारंभात देण्यात येईल.
या पुरस्काराचे संपूर्ण श्रेय पंचायत समिती कोरपना, ग्रामपंचायत बिबी व संबंधित लाभार्थ्यांना जाते. या तिन्ही स्तरावर व्यवस्थित ताळमेळ ठेवून काम हाताळल्यामुळे व लाभार्थ्यांनी शासनाकडून मिळालेल्या अनुदानापेक्षा जास्त रक्कम खर्च करून घरकुल बांधकाम केल्यामुळे बिबी ग्रामपंचायत या पुरस्काराची मानकरी ठरली. शासनाची कोणतीही योजना सक्षमपणे राबविण्यासाठी बिबी ग्रामपंचायत आघाडीवर आहे.- आशिष देरकरमाजी उपसरपंच, ग्रा. पं. बिबी











टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.