- वेकोलिने दिले एका महिन्यात नुकसान भरपाई व सेक्शन 4(1) लावण्याचे दिले लेखी आश्वासन
- राजुरा विधानसभा क्षेत्र समन्वयक बबनभाऊ उरकुडे यांच्या नेतृत्वात होणाऱ्या आंदोलनाचा वेकोलिने घेतला धसका
राजुरा -
दि. २९ जुलै रोजी शिवसेना राजुरा विधानसभा क्षेत्र समन्वयक बबनभाऊ उरकुडे, गोवरी गावचा सरपंच आशाताई उरकुडे व गोवरी गावकरी यांची क्षेत्रीय कार्यालयात बैठक झाली, त्यात असे ठरले कि, दि. २२ जुलै ला झालेल्या पावसामुळे वेकोलिने वळविलेल्या पाण्याच्या नाल्याचे पाणी ओव्हरफ्लो झाल्यामुळे पिकांच्या नुकसानीच्या भरपाई संदर्भात पुढील महिन्यात होणाऱ्या वेकोलि बोर्डा पुढे एसडीएम कार्यालयाकडून पिकाच्या नुकसानीचा सर्वेक्षण अहवाल दिल्यानंतर भरपाईची रक्कम भरण्याचा प्रस्ताव तयार करून तो वेकोली मुख्यालयात पाठवण्याची कार्यवाही केली जाईल आणि कलम 4(1) लावण्याचा एका महिन्यात प्रयत्न केला जाईल. म्हणून वेकोलि प्रशासनाकडून विनंती करण्यात आली कि वेकोलि विरोधात ३ ऑगस्ट ला होणारे डिस्पॅच व काम बंद आंदोलन परत घेऊन वेकोलि व्यवस्थापनेला सहकार्य करण्याची विनंती करण्यात आली.
दि. २२ जुलै ला झालेल्या संततधार पावसामुळे गोवरी गावातील जवळपास ३०० एकरच्या वर शेती व २५० च्या वर घरे पाण्याखाली आली होती. वेकोलिने वळविलेल्या पाण्याच्या नाल्याचे पाणी ओव्हरफ्लो झाल्यामुळे घरात व शेतशिवारात पाणी घुसल्याच्या आरोप शिवसेना राजुरा विधानसभा क्षेत्र समन्वयक बबनभाऊ उरकुडे यांनी लावला होता. गावातील संतप्त शेकडो लोकांनी वेकोलि अधिकाऱ्यांना गावात आणून घेराव केला होता. शिवसेनेने येत्या ३ ऑगस्ट ला वेकोलीविरुद्ध मोठा एल्गार पुकारत डिस्पॅच व काम बंद आंदोल करण्याचा इशारा दिला होता. परंतु आंदोलनापूर्वीच दि. २९ जुलै रोजी क्षेत्रीय कार्यालयात झालेल्या बैठकीत वेकोलि प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळाल्याने आंदोलन तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीत क्षेत्रीय मुख्य व्यवस्थापक सब्यसाची डे साहेब, जी. पुल्लय्या, गोवरी गावचा सरपंच आशाताई उरकुडे, राजुरा विधानसभा क्षेत्र समन्वयक बबनभाऊ उरकुडे, पोवनी चे सरपंच पांडुरंग पोटे, ग्रापं सदस्य चेतन बोबाटे, माजी सरपंच विठ्ठल पाचभाई, शेतकरी प्रभाकर बोढे, शंकर बोढे, हरिश्चंद्र जुनघरी, अरुण पाचभाई, आकाश नांदेकर, संदीप देवाळकर, रामदास पाचभाई, सचिन पाचभाई, संतोष पाचभाई, उमेश पाचभाई व गोवरी, पोवनी, चिंचोली गावातील पूरग्रस्त नागरिक उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.