Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: मोहम्मद इरफान शेख यांची चंद्रपूर महानगर काँग्रेसच्या महासचिव पदी नियुक्ती
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी चंद्रपूर - सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर राहणारे उत्कृष्ट वक्ते मोहम्मद इरफान शेख यांची चंद्रपूर शहर (जिल्...
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर राहणारे उत्कृष्ट वक्ते मोहम्मद इरफान शेख यांची चंद्रपूर शहर (जिल्हा) कांग्रेस कमेटीच्या महासचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे. मागील अनेक वर्षांपासून सामाजिक व राजकीय जीवनात नेहमी संघर्ष हा इरफान शेख यांच्या आयुष्यातील महत्वाचा भाग राहिलेला आहे. नुकतेच त्यांनी कांग्रेस पक्षात प्रवेश करीत आपल्या वक्तव्य कौशल्याने सर्वांची मने जिंकली. त्यांच्या कार्याची दखल घेत शहर अध्यक्ष रामू तिवारी यांनी इरफान शेख यांचा शहर कार्यकारणी मध्ये समावेश केला. नुकताच खासदार धानोरकर यांच्या हस्ते इरफान शेख यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. मोहम्मद इरफान शेख यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी खासदार धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर, कांग्रेस कमेटी जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, शहर अध्यक्ष रामू तिवारी यांनी शुभेच्छा दिल्या आहे.











About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top