Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते शहरातील विविध ठिकाणच्या १२ विकास कामांचे भुमिपूजन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी चंद्रपूर - शहरातील विविध विकास कामांसाठी स्थानिक विकास निधी व खनिज विकास निधीतून आमदार किशोर जोरगेवार यांन...
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
शहरातील विविध विकास कामांसाठी स्थानिक विकास निधी व खनिज विकास निधीतून आमदार किशोर जोरगेवार यांनी मोठा  निधी मंजूर केला असून या निधीतून लालपेठ, इंदिरा नगर आणि पागलबाबा नगर येथील १२ विकास कामे केल्या जाणार आहे. आज या कामांचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे संघटक कलाकार मल्लारप, आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे, राजेश वर्मा,  संजीव बहूरीया, अशोक अहूजा, बंडु तोटावार, वेकंटेश सुरा, सुदामा यादव, क्रिष्णा यादव,  प्रतिक रामटेके, अमन खान, मनोज मत्ते, वेनू कोडेन, चंद्रकांत पाटील, रुपेश मुलकावार, नरेश आत्राम, संदिपपान मुन, नितेश बोरकूटे, सतिश सोनटक्के, निखील शेंडे, कल्पना पाटील, सुनंदा मून, लक्ष्मन पूरेड्डीवार, मदन माडूरवार, क्रिष्ण स्वामी, अच्यूतन नायर, शिंघरी यादव, मधूकर मोहितकर, निताई कुंन्डू, सूभाष सोनी,  किशोर रामशेट्टीवार आदिंची उपस्थिती होती.
विधानसभा क्षेत्रातील शहरी व ग्रामीण भागाच्या विकासासाठी आमदार किशोर जोरगेवार यांचे सातत्याने प्रयत्न सुरु असून या भागाच्या विकास कामांसाठी त्यांच्या वतीने स्थानिक विकास निधी व खनिज विकास निधीतून मोठा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या निधीतून इंदिरा नगर येथील सिमेंट काँक्रिटचे तिन रोड,  पागलबाबा नगर येथील सिमेंट काँक्रीट रोडसह इतर ८ विकास कामे तसेच लालपेठ येथील सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम मंजूर करण्यात आले आहे. या सर्व विकास कामांचे आज शुक्रवारी आ. किशोर जोरेगेवार यांच्या हस्ते भुमिपूजन संपन्न झाले. 











About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top