Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी उद्याच लागणार दहावीचा निकाल
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
दुपारी 1 वाजता होणार जाहीर वर्षा गायकवाड यांनी दिली माहिती यावर्षी 2021 साली एकूण 16 लाख 58 हजार 624 विद्यार्थी दहावीच्या परिक्षेसाठी पात्र ...
  • दुपारी 1 वाजता होणार जाहीर
  • वर्षा गायकवाड यांनी दिली माहिती
  • यावर्षी 2021 साली एकूण 16 लाख 58 हजार 624 विद्यार्थी दहावीच्या परिक्षेसाठी पात्र ठरले होते.
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
मुंबई -
दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. उद्या दहावीचा निकाल लागणार आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याविषयी माहिती दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर दहावीच्या निकालांविषयी अंदाज वर्तवले जात होते. दरम्यान आता शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी उद्या दुपारी 1 वाजता निकाल जाहीर होणार असल्याचे सांगितले आहे.
कोरोना व्हायरचा वाढता धोका पाहता दहावीच्या परीक्षा या रद्द करण्यात आलेल्या होत्या. मात्र दहावीच्या विद्यार्थ्यांचे मुल्यमापन हे अंतर्गत गुणांच्या सहाय्याने करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 1-- गुणांच्या मूल्यमापनामध्ये ५० गुण हे या विद्यार्थ्यांच्या नववीच्या गुणांवरुन दिले जाणार होते. तर उर्वरीत 50 गुण हे दहावीच्या मूल्यमापनावर आधारित असणार आहेत. विद्यार्थ्यांना जर मिळालेले गुण समाधानकारक वाटत नसतील तर कोरोना प्रादुर्भाव संपल्यानंतर विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देऊ शकतात.
यावर्षी 2021 साली एकूण 16 लाख 58 हजार 624 विद्यार्थी दहावीच्या परिक्षेसाठी पात्र ठरले होते. यामधील 9 लाख 9 हजार 931 ही मुले आहेत. तर मुलींची संख्या 7 लाख 48 हजार 693 इतकी आहे.





Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top