Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका व वाचनालय बनविण्याकरिता प्रयत्न करणार - भारती पाल
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
युवकांसाठी वाचनालयाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या मागणीचे निवेदन सादर ग्रापं बामनवाडा येथील युवकांनी मानले सरपंच भारती पाल यांचे आभार आमचा...
  • युवकांसाठी वाचनालयाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या मागणीचे निवेदन सादर
  • ग्रापं बामनवाडा येथील युवकांनी मानले सरपंच भारती पाल यांचे आभार
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
गेल्या कित्येक वर्षापासून बामनवाडा येथील नागरिक वेगवेळ्या प्रकारच्या समस्यांना तोंड देऊन त्रासले होते. भूतकाळात ग्रापं पदाधिकारी व सदस्य या  सर्वांना समस्या निदर्शनास आणून सुद्धा समस्याचे निवारण होत नव्हते. गावातील नागरिकांना रस्ते, पथदिवे, नाली साफसफाई, पिण्याच्या पाण्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागत होते परंतु बामनवाडा येथील नवनिर्वाचित महिला सरपंच भारती पाल यांनी पदभार सांभाळताच जनता जनार्दनांच्या मूलभूत समस्यांना सोडविण्यात भर दिला असून फक्त ५ महिन्याच्या कालावधीतच निम्म्या समस्यांच्या निवारण केल्याने नागरिकांत समाधान व्यक्त करण्यात येत आहे. 
गेल्या पाच महिन्यात सरपंचानी केलेल्या कामाची प्रशंसा स्वतः तेथील नागरिक करीत असून हीच त्यांच्या कामाची पावती समजल्या जात आहे. ज्या प्रमाणे एक महिला आपले घर सांभाळते. त्याच प्रमाणे सत्ता हाती घेतल्यास गावालासुद्धा सांभाळू शकते यांचे जिवंत उदाहरण म्हणजे बामनवाडा महिला सरपंच भारती पाल व त्यांच्या खांद्याला खांदा लावून साथ देणारी त्यांची संपूर्ण सदस्य टीम आहे. बामनवाडा ग्रापं येथे पाच महिला सदस्य असून चार पुरुष सदस्य आहे. यावरून प्रशासनाचे महिला सशक्तीकरण/सक्षमीकरणाचे प्रयत्नाचे उत्तम उदाहरण दिसून येत आहे. 
फक्त ५ महिन्याच्या कालावधीतच उत्कृष्ट काम करणाऱ्या सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य व कर्मचारी यांचा बामनवाडा येथील युवकांनी तसेच बिरसा क्रांती दलाचे चे जिल्हा युवाअध्यक्ष अभिलाष परचाके, अक्षय मरस्कोल्हे, अक्षय गाठे, अनिकेत नगराळे, रोहित नगराळे, दर्शन नगराळे, ज्येष्ठ समाजसेवक देवानंद रांजिकर, ऑफ्रोट चे तालुका अध्यक्ष डॉ. मधुकर कोटनाके यांनी पुष्पगुच्छ देऊन आभार मानले. यासोबतच बामनवाडा येथील सुशिक्षित युवकांसाठी वाचनालयाची सुविधा करून देण्यात यावी या मागणीचे निवेदन सुद्धा सरपंचांना देण्यात आले. ग्रापंतील सर्व सदस्यांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला. यावेळी उपसरपंच अविनाश टेकाम, ग्रापं सदस्य समिश्रा झाडे, ग्रापं सदस्य सुजाता मेश्राम, ग्रापं सदस्य मंजुषा कोडापे, ग्रापं सदस्य प्रफुल चौधरी, ग्रापं सदस्य सर्वानंद वाघमारे, ग्रापं सदस्य भारती पंकज करमनकर, ग्रापं सदस्य राकेश वाघमारे, सचिव दत्ता कौठाळकर, पंकज करमनकर, अश्विनी मेश्राम, प्रदीप पाल, मंगेश गेडाम, सुमित, जगदीश पाल उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी अभ्यासिका व वाचनालया बनविण्याच्या मागणीचे निवेदन देणे ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. गावातील विद्यार्थी उच्च शिक्षित होणे हि खरोखरच अभिनंदनाची बाब ठरेल याकरिता आम्ही काचोटीने प्रयत्न करू.
भारती जगदीश पाल
सरपंच, ग्राम पंचायत, बामणवाडा 

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top