Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: सुगंधित तंबाखू विक्रीला मोकळे रान
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अन्न व औषधी विभागाचे कान, डोळे व तोंडावर हाथ गब्बर तंबाखू माफियांवर कारवाई का नाही ; सर्वसामान्यांचा प्रश्न शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिध...

  • अन्न व औषधी विभागाचे कान, डोळे व तोंडावर हाथ
  • गब्बर तंबाखू माफियांवर कारवाई का नाही ; सर्वसामान्यांचा प्रश्न
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
गुटखा आणि पानमसाला बंदीची व्याप्ती वाढवून सुगंधित तंबाखू, सुंगधित सुपारी अथवा खर्रा (मावा) यांच्या खुल्या आणि बंद पॅकेटमधील विक्री, साठवणूक अथवा वितरणाला २०१३ पासून बंदी घालण्यात आली आहे, परंतु जिल्हात या कायद्याची अंमलबजावणी केली जात नाही. राज्यात २० जुलै २०१२ पासून एक वर्षाकरिता तंबाखू, निकोटीन, मॅग्नेशियम कार्बोनेट यांचा समावेश असलेल्या अथवा स्वतंत्रपणे विक्री केल्यानंतर ज्याचे गुटख्यामध्ये रूपांतर होईल अशा पदार्थांच्या उत्पादन, साठा, वितरण अथवा विक्री यावर बंदी घालण्यात आली. त्याला १९ जुलै २०१३ रोजी एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली होती. खाण्याच्या पदार्थांत ‘अँटीकेकिंग एजंट’ म्हणून मॅग्नेशियम कार्बोनेटसच्या वापरास निर्बंध असल्याने त्याआधारे ही बंदी टाकण्यात आली होती. 

नेमक्या याच बंदीचा फायदा उचलत सुगंधित तंबाखू माफियांनी काही भ्रष्ट अधिकाऱ्यांना हाताशी धरून दाम वाढवून बंदी असतांनाही तत्सम पदार्थाची विक्री वाढविली. सुगंधित तंबाखू विक्रेत्याची सेटिंग ही अन्न औषधी विभागातच नसून संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचे या केमिकल युक्त सुगंधित तंबाखू विक्रेत्यांना अभय देत असल्याची ओरड चंद्रपूर जिल्हात होत आहे. अन्न औषधी विभाग व प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांच्या मोबाईल मधून कॉल रेकॉर्ड चेक करण्यासोबत आता या विभागातील सीसीटीव्ही चेक केल्यास अधिकारी व सुगंधित तंबाखू माफियांचे काय साटेलोटे आहे ते पुढे येण्याची शक्यता नागरिक वर्तवित आहे. मागील अनेक वर्षांपासून सुगंधित तंबाखू विक्रेते व अन्न औषधी विभाग यांचे मधुर संबंध येथील जनतेला माहित असून या भ्रष्ट अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई कोण करणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. तारणहारच मारानहार बनल्याने व प्रशासनाच्या भोंगळ कारभाराने मात्र युवा पिढी चे भवितव्य धोक्यात आल्याचे दिसून येत आहे.

बातम्या अधिक आहेत.....

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top