Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: नप ठेकेदाराला पडला नालीवर चेम्बर बसविण्याचा विसर
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
ठेकेदारांचा दिरंगाईने एकाचा छातीला तर एकाचा कंबरेला जबर मार पुन्हा कोणी पडण्याचा आधी चेंबर बसवा अन्यथा ठेकेदाराला चोप देण्याची नागरिकांची तय...

  • ठेकेदारांचा दिरंगाईने एकाचा छातीला तर एकाचा कंबरेला जबर मार
  • पुन्हा कोणी पडण्याचा आधी चेंबर बसवा अन्यथा ठेकेदाराला चोप देण्याची नागरिकांची तयारी
विरेन्द्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा -
स्थानिक मस्जिद वॉर्ड नं ४ मध्ये खंडाळे ते बुटले यांच्या घरापर्यंत नालीचे बांधकाम नुकतेच करण्यात आले. गडचांदूर मुख्य मार्गाला जोडणाऱ्या नालीवरील पुलाला बाजूने चेम्बर न दिल्याने दोन वेगवेगळ्या घटनेत दोन इसम या नालीत पडले. त्यात एकाचा कंबरेला व दुसऱ्याच्या छातीला जबर दुखापत झाल्याने नप ठेकेदाराच्या थातुर मातुर कामाबद्दल नागरिकांत प्रचंड चीड निर्माण झाली आहे. पुन्हा कोणी पडण्याचा आधी चेंबर बसवा अन्यथा ठेकेदाराला चोप देणार अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे. 

मस्जिद वॉर्ड नं ४ मध्ये खंडाळे ते बुटले यांच्या घरापर्यंत नालीचे बांधकाम नुकतेच करण्यात आले. ठेकेदाराने नियमानुसार रस्त्यावरील माती हटविणे गरजेचे असतांना फक्त नाली बनवून ठेकेदाराने कामाची इतिश्री केली. गडचांदूर मुख्य मार्गाला जोडणाऱ्या नालीवरील पुलाला बाजूने चेम्बर न दिल्याने रात्रीचा अंधारात पुन्हा या रस्त्यावरून ये-जा करणारे पडतील कि काय अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. विकासपुरुष नगराध्यक्ष अरुणभाऊ धोटे व मुख्याधिकारी यांनी याकडे जातीने लक्ष देत ठेकेदाराला तंबी देऊन नालीवर तात्काळ चेंबर लावून देण्याची मागणी वॉर्डातील नागरिकांनी केली आहे. 

बातम्या अधिक आहेत......

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top