- जिल्हाप्रमुख संदीपभाऊ गिऱ्हे यांची प्रमुख उपस्थिती
राजुरा -
शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून संपूर्ण राज्यात शिवसपर्क अभियान राबवण्यात येत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात 12 जुलै पासून जिल्हाभर या मोहिमेला सुरवात झाली. जिल्ह्याचे संपर्क प्रमुख प्रशांतदादा कदम यांच्या प्रमुख मार्गदर्शनात राजुरा तालुक्यातील विरूर येथे कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. भर पावसात सदर कार्यक्रम पार पडला.
जिल्ह्याचे नेते जिल्हाप्रमुख संदीपभाऊ गिऱ्हे यांनी सरकारच्या माध्यमातून चालू असलेली शिवभोजन थाळी, शेतकऱ्यांची कर्जमाफी अश्या अनेक कार्याचा उल्लेख करत सरकारच्या चाललेल्या कामाबद्दल माहिती दिली. याप्रसंगी नवनियुक्त विधानसभा समन्वयक व माजी उपजिल्हा प्रमुख बबन उरकुडे, शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र डोहे, राजुरा शहराचे शहर प्रमुख निलेश गंपावार, शिवसेना उपतालुका प्रमुख रमेश झाडे, युवासेना तालुका प्रमुख बंटी मालेकर, नवनियुक्त उप तालुका प्रमुख सुधाकर मोरे पाटील, गुलाब देठे, शंकर झाडे, केशव जिवतोडे, अँथनी गोगुलवर, शिवा कंमलवर, स्वप्नील भोस्कर, झमिर शेख, विकी विश्वास, युवा सेना, अजय सिंह, कुलदीप सिंह, तुषार मोरे, शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक, विरुर स्टेशन गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.