Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: शिवसंपर्क अभियानाअंतर्गत पाचगाव येथे कार्यकर्त्यांशी संवाद
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
जिल्हासंपर्क प्रमुख प्रशांतदादा कदम यांची प्रमुख उपस्थिती अनंता गोखरे - उपसंपादक राजुरा - शिवसेना पक्षप्रमुख तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ...
  • जिल्हासंपर्क प्रमुख प्रशांतदादा कदम यांची प्रमुख उपस्थिती
अनंता गोखरे - उपसंपादक
राजुरा -
शिवसेना पक्षप्रमुख तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून संपूर्ण राज्यात शिवसंपर्क अभियान राबवण्यात येत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात 12 जुलै पासून जिल्हाभर या मोहिमेला सुरवात करण्यात झाली.
जिल्ह्याचे संपर्क प्रमुख प्रशांतदादा कदम यांच्या मार्गदर्शनात आणि उपस्थितीत राजुरा तालुक्यातील पाचगाव येथे कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. भर पावसात पार पडलेल्या या कार्यक्रमाला जिल्ह्याचे संपर्कप्रमुख प्रशांतदादा कदम यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सरकारच्या योजनांबाबत माहिती देत कार्यकर्त्यांना कुठल्याही समस्या असल्या तरी आपण त्या पक्ष्याच्या माध्यमातून सोडवू अशी भूमिका मांडली.
जिल्ह्याचे नेते जिल्हाप्रमुख संदीपभाऊ गिऱ्हे यांनी सरकारच्या माध्यमातून सुरु असलेली शिवभोजन थाळी, शेतकऱ्यांची कर्जमाफी अश्या अनेक कार्याचा उल्लेख करत सरकारच्या चाललेल्या कामाबद्दल माहिती दिली.
याप्रसंगी तालुक्याचे नेते माजी उपजिल्हा प्रमुख बबन उरकुडे, शिवसेना राजुरा शहराचे नेते निलेश गंपावार, शिवसेना उपतालुका प्रमुख रमेश झाडे, युवासेना तालुका प्रमुख बंटी मालेकर, रोहित विरुतकर गावातील शिवसेनेचे शाखाप्रमुख मनोज कुरवटकर, हनुमान मंदिर अध्यक्ष दशरथ भोयर, कट्टर शिवसैनिक विजय जाबोर, महिला विभाग प्रमुख सौ कलाताई इंदूरवार, सौ अंजनाताई भोयर, सौ शशिकला वाकूलकर, सौ भिवनकर ताई, युवासेना शाखाप्रमुख सुनील गौरकर, सचिव संदीप घ्यार, मिथुन नुलावार, सचिन वाकूलकर, उदय नुलावार, प्रशांत भेंडे, गणेश भोयर, विशाल भेंडे, प्रवीण भिवनकर, सुनील सुरपाम, आकाश जिवतोडे, निशिकांत भेंडे, बाळकृष्ण बोबळे आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top