- सोबत नवीन पदाधिकाऱ्यांचीही नियुक्ती
- पक्षाला सावरण्याचे मोठे आव्हान नवीन पदाधिकाऱ्यांच्या खांद्यावर
- नियुक्तीबद्दल काय म्हणाले नवनियुक्त राजुरा शिवसेना तालुका प्रमुखपदी राजूभाऊ डोहे बघा व्हिडीओ
राजुरा -
राजुरा शिवसेना तालुका प्रमुखपदी राजूभाऊ डोहे यांची नियुक्ती करण्यात आली आहे तसेच विविध कार्यकर्त्यांना पदाधिकारी बनवून त्यांचीही निवड करण्यात आली आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना चंद्रपूर जिल्हा संपर्क प्रमुख प्रशांतदादा कदम यांनी ही नियुक्ती केली. शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे, उपजिल्हा प्रमुख संदीप करपे व जेष्ठ शिवसैनिकांनी नवनियुक्त राजुरा शिवसेना तालुका प्रमुखपदी राजूभाऊ डोहे, शिवसेना राजुरा विधानसभा क्षेत्र समन्वयक बबनभाऊ उरकुडे, शिवसेना राजुरा तालुका समन्वयक वासुदेव चापले, शिवसेना शहर प्रमुख निलेश गंपावार, शिवसेना राजुरा शहर समन्वयक सुनील लेखराजानी या नवीन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
काही दिवसांपासून पक्षात निर्माण झालेली मरगळ, गटबाजी यातून पक्षाला सावरण्याचे मोठे आव्हान या नवीन पदाधिकाऱ्यांच्या खांद्यावर आहे. नगरसेवक राजूभाऊ डोहे हे राजकारणात गत अनेकवर्षापासून सक्रिय आहेत. गत राजुरा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत ते अपक्ष उमेदवार म्हणून उभे होते त्यात त्यांनी प्रचंडमताने विजय प्राप्त केला होता. नंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला. गेल्या अनेकवर्षापासून कोणतेही पद नसतांना शिवसेनेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्याकरिता ते संघर्षरत होते. कोणतेही पद नसतांनाही शिवसेनेच्या संघटनबांधणीत ते सक्रिय होते. त्यांच्या याच कामाची पावती म्हणून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना चंद्रपूर जिल्हा संपर्क प्रमुख प्रशांतदादा कदम यांनी ही नियुक्ती केली.
राजूभाऊ डोहे यांच्या नियुक्तीने तालुक्यातील शिवसैनिकांत एक वेगळाच जोश, उत्साह आणि नवचैतन्याचे वातावरण बघायला दिसत आहे. नव्या पदाधिकाऱ्यांच्या या नियुक्तीने तालुक्यात शिवसेनेला नवसंजीवनी मिळाली असे तालुक्यातील शिवसैनिकांचे म्हणणे आहे. राजूभाऊ डोहे व अन्य पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती बद्दल अमोल कोसूरकर, रमेश झाडे, बंटी मालेकार, नितेश राजूरकर, मोनू सूर्यवंशी, समीर शेख, गणेश चोथले, जावेद शेख, बाळू कुइटे, ललित शेरगील, पापा यादव, सचिनसिंह बैस यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
नियुक्तीबद्दल काय म्हणाले नवनियुक्त राजुरा शिवसेना तालुका प्रमुखपदी राजूभाऊ डोहे बघा व्हिडीओ
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.