Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: राज्यमंत्री ना.प्राजक्त तनपुरे गुरुवारला कोरपना येथे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
नारंडा येथील दालमिया सिमेंट कंपनीच्या कामगाराच्या समस्या बाबत चर्चा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांशी संवाद व कार्यकर्ता बैठक ...
  • नारंडा येथील दालमिया सिमेंट कंपनीच्या कामगाराच्या समस्या बाबत चर्चा
  • राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांशी संवाद व कार्यकर्ता बैठक

शैलेश कोरांगे - आमचा विदर्भ प्रतिनिधी
कोरपना -
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे चंद्रपूरचे संपर्क मंत्री व महाराष्ट्र राज्याचे नगरविकास ऊर्जा व तंत्रशिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री ना.प्राजक्त तनपुरे १५ जुलै रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून ते कोरपना, जिवती तालुक्यातील विभागाच्या समस्या तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या विविध फ्रंटल कार्यकर्ता संवाद व बैठकीत संवाद साधतील अशी माहिती राका कोरपना कडून देण्यात अली आहे. 
कोरपना येथे १५ जुलै ला सकाळी ११ वाजता कार्यकर्तेची बैठक आयोजित करण्यात आली आहे त्यानंतर नारंडा येथील दालमिया सिमेंट कंपनी च्या कामगाराच्या समस्या बाबत चर्चा केल्या जाणार आहे. दुपारी १२ येरगव्हाण येथे आदिवासी नागरिकांची चर्चा व २ वाजता जीवती कडे प्रस्थान तेथून ३ वाजता पाटण येथील आदिवासी पाडावर भेट व आदिवासी कुटुंबाशी चर्चा येथून आदिवासी बाधीत कुटुंबाशी भेट घेण्यासाठी कुसुंबी या आदिवासी गावाला भेट देऊन त्या गावातील आदिवासी जमीन संबंधी चर्चा करून ५ वाजता गडचांदूर मार्गे चंद्रपूर पोहचतील या कार्यक्रमाला व बैठकीला कार्यकर्त्यांनी कोविड नियमाचे पालन करून मास्क लावून उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top