Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: सामान्य नागरिकांना महागाईच्या खाईत लोटणाऱ्या सरकारला धडा शिकवा - आमदार सुभाष धोटे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
राजुऱ्यात काँग्रेसची महागाई विरोधात सायकल व बैलगाडी रॅली विरेन्द्र पुणेकर - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी राजुरा - केंद्र सरकारने पेट्रोल, डि...
  • राजुऱ्यात काँग्रेसची महागाई विरोधात सायकल व बैलगाडी रॅली
विरेन्द्र पुणेकर - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
राजुरा -
केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅस व जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत भरमसाठ वाढ केली आहे. पेट्रोलने १०७ रुपये लिटर चा टप्पा पार केला असून डिझेल ९४ रुपये लिटर आहे. स्वयंपाकाचा गॅस च्या किमती ९०० च्या घरात पोहचल्या आहेत. अन्य जीवनावश्यक वस्तूंच्या किमती सुध्दा गगनाला भिडल्या आहेत. या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. हे सरकार सर्व आघाडय़ांवर अपयशी ठरले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना महागाईच्या खाईत लोटणाऱ्या सरकारला सत्तेवरून खाली खेचून धडा शिकवा असे आवाहन आमदार सुभाष धोटे यांनी राजुरा काँग्रेस द्वारा आयोजित भवानी मंदिर ते संविधान चौक आणि संविधान चौक ते तहसील कार्यालय राजुरा पर्यंत काढण्यात आलेल्या सायकल रॅली आणि जन आक्रोश आंदोलन प्रसंगी केले आहे. या प्रसंगी राजुरा तालुका काँग्रेस कमिटीचे वतीने तहसीलदार हरिश गाडे यांच्या मार्फत महामहीम राष्ट्रपतींना निवेदन पाठविण्यात आले. या रॅलीत शेतकरी, शेतमजूर, कामगार, महिला, युवक वर्ग तसेच सर्व स्तरातील सर्व सामान्य नागरिकांनी केंद्रातील सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा, नारेबाजी करीत उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. 
याप्रसंगी नगराध्यक्ष अरुण धोटे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या महिला सचिव नम्रता ठेमस्कर, अशोकराव देशपांडे, उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, राजुरा तालुका कॉंग्रेस अध्यक्ष रंजन लांडे, सेवादल अध्यक्ष दिनकर कर्नेवर,ओबीसी ग्रामीण जिल्हाध्यक्ष तथा कार्या अध्यक्ष नंदकिशोर वाढई, जि प सदस्य मेघाताई नलगे, सभापती मुमताज जावेद अब्दुल, उपसभापती मंगेश गुरणुले , प.स. सदस्य  कुंदाताई जेणेकर, तुकाराम मानुसमारे, रामदास पुसाम, नगरसेवक हरजीत सिंग संधू, आनंद दासरी, गजानन भटारकर, स न यो अध्यक्ष साईनाथ बतकमवार, तालुका काँग्रेसचे शहराध्यक्ष संतोष गटलेवर, महिला काँग्रेस शहराध्यक्ष तथा नगरसेविका संध्या चांदेकर, नगरसेविका दिपा करमनकर, गीता रोहने, शारदा टिपले, साधना भाके, महिला काँग्रेस अध्यक्षा कविता उपरे,  हरिचंद्र जुनघरी, शिवराम लांडे, सर्वानंद वाघमारे, अविनाश जेनेकर, सय्यद सकावत अली, संतोष इंदुरवार, चंद्रकात धोटे, रामभाऊ ढुमने, लहू चहारे, रामभाऊ देवईकर, कवडू सातपुते, श्यामभाऊ कोटनाके, जंगु पाटील मडावी, गजेंद्र ढवस, अमोल घटे, माजी नगरसेवक प्रभाकर येरने, राजु पिंपळशेंडे, राजाराम येल्ला, पंढरी चंन्ने, विकास देवाडकर, इर्शाद शेख, धनराज चिंचोलकर, राजकुमार ठाकूर, प्रणय लांडे, शाहनवाज कुरेशी, आकाश मावलीकर, कोमल पुसाटे, जगदीश बुटले, संदीप घोटेकर, सय्यद साबीर, माजी सभापती निर्मला कुडमेथे, सुमित्रा कुचनकर, अर्चना गर्गेलवार, शुभांगी खामनकर. नंदाताई गेडाम, पुनम गिरसावळे, मंगला हांडे, योगिता मटाले, संगीता धोटे, यासह राजुरा तालुका काँग्रेस, शहर काँग्रेस, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, किसान काँग्रेस, सेवादल काँग्रेस, ओबीसी विभाग, अल्पसंख्याक विभाग, अनु.जाती जमाती विभाग, एन.एस.यु.आय इत्यादी विभागाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top