Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: अनिल मडावी या आदिवासी युवकाच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करावी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शेतकरी संघटनेची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी विरेन्द्र पुणेकर - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी राजुरा - चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील...
  • शेतकरी संघटनेची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
विरेन्द्र पुणेकर - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
राजुरा -
चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील विरुर स्टेशन येथील आदिवासी युवक अनिल गणपत मडावी या 29 वर्षीय युवकाला रेल्वे पोलिसांनी ९ जुलै रोजी त्याचे घरून पकडून नेले. या युवकाचा रेल्वे पोलीस कोठडीत मृत्यू झाला असल्याने ही बाब केंद्र सरकारच्या अखत्यारित असल्यामुळे गुन्ह्याची चौकशी रेल्वे पोलिसांकडून काढून सीबीआयला सोपवावी, अशी मागणी शेतकरी संघटनेने मा. केंद्रीय गृहमंत्री, मा.केंद्रीय रेल्वेमंत्री व मा.रेल्वे राज्यमंत्री यांच्याकडे केली आहे. 
राजुरा तालुक्यातील विरुर स्टेशन येथील आदिवासी युवक अनिल गणपत मडावी याला रेल्वे पोलिसांनी दिनांक ९ जुलै रोजी त्याचे घरून पकडून नेले. या युवकाचा रेल्वे पोलीस कोठडीत संशयास्पद मृत्यू झाला. आरपीएफच्या कोठडीत या युवकाचा मृत्यू झाला असतांना या प्रकरणाची तेच चौकशी करीत असल्याने या आदिवासी कुटुंबाला न्याय मिळेल, याबद्दल संशय व्यक्त करण्यात येत आहे. हे प्रकरण केंद्र सरकारच्या अखत्यारीत असल्यामुळे या गुन्ह्याची चौकशी आरपीएफ करून काढून सीबीआयकडे सोपवली तरच ती चौकशी निष्पन्न पणे होऊन मृतकाचे कुटुंबाला न्याय मिळण्याची शक्यता आहे. यामुळे या आदिवासी युवकाच्या झालेल्या मृत्यूची योग्य चौकशी होऊन रेल्वे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई होणे शक्य आहे. म्हणून ही चौकशी रेल्वे पोलिसांकडून काढून ती सीबीआयकडे सोपवावी, अशी मागणी ईमेल द्वारे केंद्रीय गृहमंत्री मा.ना.अमित शहा, केंद्रीय रेल्वेमंत्री मा.ना.आश्विनी वैष्णव व केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार अँड.वामनराव चटप, बाजार समिती माजी सभापती प्रभाकर ढवस, माजी जि.प.समाजकल्याण सभापती नीळकंठ कोरांगे, शेषराव बोंडे, कपिल इद्दे, सिंधू बारसिंगे, चंद्रकला ढवस, भास्कर सिडाम, श्रीनिवास ईलंदुला, गुलाब ताकसांडे, ईश्वर झाडे, आबाजी ढवस, संतोष ढवस यांनी केली आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top