Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: मराठा कामगार संघटनेच्या वतीने साडे सात लाखाचा धनादेश वितरित
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
माजी खासदार नरेश बाबू पुगलिया यांचे नेतृत्व कोरोनामुळे मृत पावलेल्या कामगारास आर्थिक मदत धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी गडचांदुर -...
  • माजी खासदार नरेश बाबू पुगलिया यांचे नेतृत्व
  • कोरोनामुळे मृत पावलेल्या कामगारास आर्थिक मदत
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदुर - 
मराठा सिमेंट वर्क्स अंतर्गत अंबुजा सिमेंट कंपनी मध्ये गुरुनानक ट्रान्सपोर्ट या ठिकाणी ड्रायव्हर म्हणून काम करत असलेला देवराव तलांडे सदर कामगाराचा दि. २२ एप्रिल २०२१ ला कोरोनामुळे मृत्यू झाला. सदर कामगाराच्या मृत्यूमुळे त्याच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्याच्या पश्चात त्याला आर्थिक मदत मिळावी या हेतूने मराठा कामगार संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या नेतृत्वात कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी अजय मानवटकर, सागर बल्की, इक्बाल शेख आणि समस्त पदाधिकारीच्या उपस्थितीत मृत कामगाराच्या परिवाराला कोविड रिलीफ फंड म्हणून 5 लाख रुपये, मेजर व कामगार बंधू आणि भगिनीच्या वतीने दोन लाख 22 हजार 700 रुपये असा एकूण सात लाख बावीस हजार सातशे रुपये धनादेश मृतकाच्या कुटुंबियांस वितरित करण्यात आला. या मदतीसाठी मृतकाच्या कुटुंबियांनी मराठा कामगार संघटनेचे आभार मानले आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top