Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: चंद्रपुरातील रघुवंशी कॉम्प्लेक्स गोळीबार प्रकरण ; बल्लारपूर येथून दोन युवकांना अटक
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स चंद्रपूर - सोमवारी शहरातील मुख्य बाजारपेठेतील रघुवंशी कॉम्प्लेक्स परिसरात आकाश उर्फ चिन्ना अंदेवार या युवकावर...
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
चंद्रपूर -
सोमवारी शहरातील मुख्य बाजारपेठेतील रघुवंशी कॉम्प्लेक्स परिसरात आकाश उर्फ चिन्ना अंदेवार या युवकावर बुरखाधारी युवकाने अंधाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात आकाश हा गंभीररीत्या जखमी झाला. ही घटना सोमवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. त्यानंतर पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाळे यांचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बल्लारपूर येथून दोन युवकांना रात्रीच्या सुमारास अटक केली आहे. अंकुश वर्मा, अमित सोनकर अशी अटकेतील युवकांची नावे आहेत. विशेष म्हणजे, अटकेतील दोन्ही युवक बल्लारपुरातील एका टोळीचे सदस्य असल्याची प्राथमिक माहीती आहे.
काही महिन्यांपूर्वी बल्लारपूर येथे बामणी परिसरात आपल्या चारचाकी वाहनात असताना त्याचेवर गैंगवार मधून गोळीबार करण्यात आला होता. त्यात सुरज बहुरिया याचा मृत्यू झाला. या प्रकरणात तब्बल १० युवकांना ताब्यात घेण्यात आले होते. यातील ५ युवकांना दोन महिन्यांपूर्वी जामीन मिळाला होता. त्यात कालच्या गोळीबारात जखमी झालेल्या आकाशचा समावेश होता.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top