Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: सलून असोसिएशनने ठाणेदार व फेडरेशनचे अध्यक्ष राम किशोर सारडा यांचे मानले आभार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी चंद्रपूर - शनिवार व रविवारच्या मार्गदर्शक सूचनांच्या गैरसमजांमुळे पोलिस प्रशासनाने तुकुम येथील सलून व्यावस...

शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
शनिवार व रविवारच्या मार्गदर्शक सूचनांच्या गैरसमजांमुळे पोलिस प्रशासनाने तुकुम येथील सलून व्यावसायिकास सकाळचे सद्य दुकान बंद ठेवण्याचे आदेश दिले. सलून असोसिएशनने फेडरेशन ऑफ ट्रेड कॉमर्स अँड इंडस्ट्रीजशी संपर्क साधला. फेडरेशन ऑफ ट्रेड कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या शिष्टमंडळाने  जिल्हाधिकारी साहेबांच्या नवीन मार्गदर्शक सूचनांबाबत तुकुम सलून व्यावसायिकासह दुर्गापूर पोलिस ठाण्यात पोहोचला. ठाणेदार श्री.धुळे साहेब हजर नव्हते, त्यांच्याशी फोनवरून संपर्क साधला गेला. त्यांनी सायंकाळी सात वाजता महासंघाचे अध्यक्ष राम किशोर सारडा, रामजीवन परमार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि रामजीवन परमार, चिराग नाथवानी व मनीष राजा यांनी दुर्गापूर ठाणेदार यांची भेट घेत वस्तुस्थिती समजावून सांगितली ठाणेदारानी   फेडरेशनच्या माध्यमातून सलून व्यापाऱ्यांना शनिवारी व रविवारी नियमांचे पालन करून 7 ते 4 वाजेपर्यंत दुकाने उघडण्याची मुभा दिली. सलून असोसिएशनने ठाणेदार साहेब व फेडरेशनचे अध्यक्ष राम किशोर सारडा यांचे आभार मानले. 

बातम्या अधिक आहेत.....

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top