Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: राजुरा विधानसभा क्षेत्र कुपोषण मुक्त करण्याचा आमदार सुभाष धोटे यांचा प्रयत्न महाराष्ट्राला प्रेरणादायी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
कुपोषण मुक्तीसाठी बाळू व सेवा कलश फाऊंडेशन कसोशीने प्रयत्न करणार - अभिजीत धोटे जिवती येथे सेवा कलश फाऊंडेशन आणि बाळु संस्थेच्या संयुक्त विद्...
  • कुपोषण मुक्तीसाठी बाळू व सेवा कलश फाऊंडेशन कसोशीने प्रयत्न करणार - अभिजीत धोटे
  • जिवती येथे सेवा कलश फाऊंडेशन आणि बाळु संस्थेच्या संयुक्त विद्यमाने २५ कुपोषित बालकांना सकष आहार भेट 
विरेन्द्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा -
आमदार सुभाष धोटे यांच्या सामाजिक दायित्वातून सेवा कलश फाऊंडेशन राजुराचे संस्थापक अध्यक्ष अभिजित धोटे यांच्या पुढाकाराने आणि बाळु संस्थेच्या माध्यमातून अतिदुर्गम आणि आदिवासी बहुल जिवती तालुक्यातील २५ कुपोषित बालकांना प्रत्येकी एक या प्रमाणे बाळु साहित्य किट भेट देण्यात आली. या प्रत्येक किट मध्ये २ किलो मोट, २ किलो चना, २ किलो मुंग, २ किलो बरबटी, २ किलो वटाना, १ किलो नाचणी, १ किलो शेंगदाणे, १ किलो गुळ हे बाळु साहित्य भेट देण्यात आले. 
याप्रसंगी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना सेवा कलश फाऊंडेशनचे अध्यक्ष अभिजीत धोटे यांनी सांगितले की राजुरा विधानसभा क्षेत्रातून कुपोषणाच्या समस्येला हद्दपार करण्याचा आमदार सुभाष धोटे यांचा मानस असून कुपोषण मुक्तीसाठी सेवा कलश फाऊंडेशन कसोशीने प्रयत्न करणार आहे. या कामात बाळु संस्था आणि सर्व सहकाऱ्यांना सोबत घेऊन परिसरातून ही समस्या पुर्णपणे हद्दपार करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करीत राहू. 
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष सभापती अंजनाताई पवार, माजी जिप सदस्य भिमराव पाटील मडावी, माजी सभापती सुग्रीव गोतावडे, नगर पंचायत जिवतीचे उपाध्यक्ष अशफाक शेख, माजी सभापती सिताराम मडावी, उपसरपंच भिमराव पवार, विस्तार अधिकारी जगन्नाथ गारूळे यासह कुपोषित बालक, त्यांचे आईवडील, अंगणवाडी सेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पत्रकार उपस्थित होते. 
कार्यक्रमाचे संचालन प्रा. प्रफुल्ल शेंडे यांनी केले. प्रास्ताविक बाळु संस्थेचे अध्यक्ष अमित महाजनवार यांनी तर आभार आयसीडीएस जिवतीचे गट समन्वयक अतुल गोरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दोन्ही संस्थेच्या सदस्यांनी अनमोल सहकार्य केले.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top