Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: कार्यकर्ता सम्मेलन व सत्कार सोहळा संपन्न
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
भारतीय कोयला खदान मजदूर संघ वर्धा व्हॅली चे सास्ती टाउनशिप येथे आयोजन  अनंता गोखरे - उपसंपादक भारतीय कोयला खदान मजदूर संघ वर्धा व्हॅली बल्ला...
  • भारतीय कोयला खदान मजदूर संघ वर्धा व्हॅली चे सास्ती टाउनशिप येथे आयोजन 
अनंता गोखरे - उपसंपादक
भारतीय कोयला खदान मजदूर संघ वर्धा व्हॅली बल्लारपुर/चंद्रपुर चा शनिवार दि. १० जुलै ला बल्लारपूर क्षेत्रातील मनोरंजन केंद्र सास्ती टाउनशिप कार्यकर्ता सम्मेलन एवं सत्कार सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रभारी कोळसा उद्योग सदस्य जेबीसीसीआय चे के.लक्ष्मा रेड्डी यांनी केले. प्रमुख उपस्थितीत अ.भा.ख.म.संघ चे महामंञी व जेबीसीसीआय चे सदस्य सुधीर घुरडे, अ.भा.ख.म.संघ चे उपाध्यक्ष शिवदयाल बिसंदरे, सुनिल मिश्रा, वेकोलि समन्वय समिती सदस्य नारायणराव सारटकर, जयंत असोले, वेकोलि कल्याण मंडळाचे सदस्य कमलाकर पोटे, सुरक्षा समिती
चे सदस्य ए. मालवीय, भाकोखमसंघ नागपूर मुख्यालय महामंञी आशिष मूर्ती प्रामुख्याने उपस्थित होते. 
यावेळी लक्ष्मा रेड्डी यांनी जेबीसीसीआय -11 च्या निर्मितीमध्ये बीएमएस संघटनेची भूमिका आणि कोळसा उद्योगाच्या सद्यस्थितीबद्दल माहिती दिली तसेच संघटना व कामगारांना आणखी बळकटीसाठी अधिक परिश्रम करण्यासाठी प्रवृत्त करणे, अशा अनेक मुद्द्यांविषयी माहिती दिली.
नारायणराव सारटकर यांनी वेकोलिची सद्यस्थिती, कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी संघटनेने केलेले प्रयत्न व इतर कामकाजाबद्दल सांगितले. तर जयंत आस्वले यांनी संघटना मजबूत करण्यासाठी सदस्यत्व वाढविण्यावर भर दिला. 
त्रिपक्षीय सुरक्षा समिती सदस्य अशोक मालवीय यांनी खाणींमध्ये काम करणाऱ्या कामगारांना सुरक्षित राहून काम करण्यासाठी घेत असलेल्या उपाययोजनांबद्दल सांगितले तर संगठनेच्या प्रयत्नांबद्दल सांगताना व्यवस्थापनाच्या उणीवांकडे लक्ष वेधून त्यांना सुधारण्याचा इशारा दिला.
जेबीसीसीआय महामंत्री सुधिर घुरडे यांनी कामगारांवर होणा अन्यायाविरोधात बीएमएसद्वारे संघर्ष सुरूच राहणार, कामगार व कार्यकर्त्यांना या चळवळीतील यशाचे श्रेय देताना संस्थेने भूतकाळात केलेल्या चळवळीविषयी माहिती देत वेतनाच्या तोडग्याच्या गरजेनुसार भविष्यातही आंदोलनासाठी तयार राहण्यास सांगितले. संस्थेचे सामर्थ्य वाढविण्यासाठी याकडे लक्ष देण्यास सांगितले व इतरही अनेक बाबींची माहिती दिली. यावेळी जवळपास पन्नास प्रकल्पग्रस्ता कामगारांनी बीएमएसच्या कामांवर विश्वास व्यक्त करत बीएमएसची सदस्यता घेत शामिल झाले. संचालन भा.को.ख.म.संघ वर्धा व्हॅली चंद्रपुर/बल्लारपुर महामंत्री जोगेन्दर यादव यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भा.को.ख.म.संघ वर्धा व्हॅली चे अध्यक्ष रमेश मुफ़कलवार हे होते. सरतेशेवटी अध्यक्षीय भाषणासह उपस्थित सर्व मान्यवर, कामगार यांचे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रत्यक्ष / अप्रत्यक्षरित्या सहकार्य केलेल्या सर्व लोकांचे आभार मानून कार्यक्रमाच्या समाप्तीची घोषणा करण्यात आली. सर्व कामगारांच्या अथक परिश्रमामुळे हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top