Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: पुरोगामी शिक्षक समितीच्या अध्यक्षपदी संजय चिडे व सरचिटणीस संदिप कोंडेकर यांची फेरनिवड
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अनंता गोखरे - उपसंपादक राजुरा - महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती शाखा राजुराच्या कार्यकारीणीचा तीन वर्षाचा कार्यकाल पूर्ण झाल्यामुळ...
अनंता गोखरे - उपसंपादक
राजुरा -
महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती शाखा राजुराच्या कार्यकारीणीचा तीन वर्षाचा कार्यकाल पूर्ण झाल्यामुळे 21जुलै 2021ला सानेगुरुजी सभागृह येथे संघटनेची सर्वसाधारण सभा ना. रा. कांबळे जिल्हाध्यक्ष यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आली. मार्गदर्शक म्हणून राज्य नेते विजय भोगेकर, राज्यसरचिटणीस हरिश ससनकर, जिल्हानेते दिपक वर्हेकर, जिल्हा सरचिटणीस रवी सोयाम, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष अडवे, इंदिरा पहानपटे, जिल्हा कोषाध्यक्ष लोमेश येलमूले, माजी मुख्याध्यापक वासूदेव गौरकार, महिला मंच अध्यक्षा माधुरी देवगडे, मोरेश्वर बोंडे, सुरेश बोंडे,नरेश बोरीकर, प्रदीप गौरकार चिमूर, ताराचंद दडमल उपस्थित होते.
आबा पाटील यांच्या प्रतिमेपुजन नंतर मुकुंद जूनघरे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सेवानिवृत्त झालेले पुरोगामी शिलेदार बाबूराव पहानपटे, मधुकर बोबडे, फाल्गुन निवलकर, श्रीमती प्रतीमा निवलकर, सौ. माया ढवस यांचा शाल, पुष्पगुच्छ व स्मृती चिन्ह देवून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक संजय चिडे अध्यक्ष यांनी केले. त्रैवार्षीक आढावा सरचिटणीस संदीप कोंडेकर यांनी मांडला. राज्य, जिल्हा पदाधिकाऱ्यांनी राजुरा कार्यकारीणीचे  कौतुक केले. सत्र 2021-2024 साठी अध्यक्ष संजय चिडे, सरचिटणीस संदीप कोंडेकर, कार्याध्यक्ष सुधीर झाडे, उपाध्यक्ष गणेश मडावी, सहसचिव मनोहर आलाम यांची फेरनिवड करण्यात आली. कोषाध्यक्ष रामकिसन चिडे, तालूका प्रमुख संघटक सुनील बोढे व हेराज सिडाम, प्रसिद्धी प्रमुख विष्णू जाधव, जिल्हा प्रतीनिधी म्हणून रामरतनजी चापले यांची निवड करण्यात आली. उत्तम कार्याबद्दल सेवानिवृत्त मुख्याध्यापिका प्रतीमा नागलकर यांनी कार्यकारीणीला भेटवस्तु देवून कौतुक केले. संचालन रामकिसन चिडे यांनी केले तर आभार सुधीर झाडे यांनी मानले. कार्यक्रमाला जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व राजुरा महिला बचत गट व पुरोगामी शिलेदार बहुसंख्येने उपस्थित होते.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top