Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या हस्ते स्वर्ग रथाचे लोकार्पण
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमदार सुभाष धोटेंच्या निधीतून स्वर्ग रथासाठी १५ लक्ष रूपये खर्च विरेन्द्र पुणेकर - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी राजुरा - नगर परिषद राजुरा च्...
  • आमदार सुभाष धोटेंच्या निधीतून स्वर्ग रथासाठी १५ लक्ष रूपये खर्च
विरेन्द्र पुणेकर - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
राजुरा -
नगर परिषद राजुरा च्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देऊन राजुरा शहरातील नागरिकांसाठी आमदार सुभाष धोटे यांनी आपल्या आमदार निधीतून १५ लक्ष रूपये निधी मंजूर करून येथे स्वर्ग रथ उपलब्ध केला. या स्वर्ग रथाचे लोकार्पण नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी स्वर्ग रथाचे चालक सिडाम यांच्याकडे चाबी सुपूर्त करून केले. 
राजुरा शहराच्या विकासासाठी आपण कट्टीबद्ध असून शहर विकासासाठी आपण सर्वांना सोबत घेऊन सातत्याने पाठपुरावा करीत आलो आहे. शहरातील नागरिकांना अंत्ययात्रेसाठी स्वर्ग रथाची आवश्यकता होती. येथे ही सुविधा उपलब्ध नसल्याने पूर्वी गडचांदूर, बल्लारपूर वरून स्वर्ग रथ आणावे लागत होते. नागरिकांची गैरसोय होत होती. ही बाब लक्षात घेऊन आमदार सुभाष धोटे यांनी येथे स्वर्ग रथ उपलब्ध करून दिला. यामुळे शहरातील नागरिकांची गैरसोय आता दूर होईल अशी प्रतिक्रिया नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी स्वर्ग रथाचे लोकार्पण प्रसंगी व्यक्त केली आहे. 
या प्रसंगी गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचे सिनेट सदस्य अजय बतकमवार, अरविंद लांडे, नगर परिषद कर्मचारी, शहरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top