Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: तालुक्यातील रस्ते झाले खड्डेमय
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
सावली तालुक्यातील हरांबा,जिबगांव, साखरी मार्गावरील रस्त्याची अवस्था अत्यंत खराब  सुनील किणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी सावली - सावली तालुक्या...
  • सावली तालुक्यातील हरांबा,जिबगांव, साखरी मार्गावरील रस्त्याची अवस्था अत्यंत खराब 
सुनील किणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
सावली -
सावली तालुक्यातील सिन्दोळा ते हरांबा लोंढोली,जिबगाव, साखरी मार्गावरील रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली असून डांबरीकरण अनेक ठिकाणी उघडले आहे. या मार्गावरील मोठे खड्डे धोकादायक ठरत आहेत. यामुळे या मार्गावरून जाताना अपघात होण्याची शक्यता बळावली आहे. सावली येथे बँका,शाळा, महाविद्यालये, पत संस्था,पशु वैद्यकीय दवाखाना, बाजारपेठ अन्य शासकीय कार्यालये सावली येथे असल्याने हरांबा,उपरी,सिर्सी,कढोली,डोनाळा, जीबगाव,साखरी या गावातील लोकांची सावलीला दररोज ये-जा असते. तसेच रात्री व दिवसा मोठ्या प्रमाणात वाहनाची रेलचेल सुरू असते.सावली तालुक्याला जोडणारा हा रस्ता गावांसाठी मुख्य मार्ग असल्याने दुचाकी-चारचाकी या मार्गे जास्त प्रमाणात जात येत असतात.मागील वर्षी थाथुरमातुर खड्डे भुजवण्याचा काम हातात घेण्यात आले पन एका पाऊसातच खड्डे मय रस्ता झाले असुन आता नूतनीकरण नाहीतर कमीत कमी खड्डे तरी बुजवावीत ही मागणी वाहन धारक करत आहेत.तयार झालेल्या रस्त्याची दुरुस्ती तर दूरच पण साध्य खड्डे सुद्धा बुजवले जात नाहीत. त्यामुळे रस्त्यावर खड्डयाचे साम्राज्य झाले असून रस्त्यांवर दुरवस्था झाली आहे.रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण उघडले असून दोन ते तीन फुटाचे पसरट खड्डे पडले आहेत. मात्र या मार्गावर मोठे खड्डे पडले असून वाहन चालकास वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागते रस्त्याची एवढी दुरवस्था झाली आहे तेव्हा प्रशासनाने नागरिकांची तालुका स्थळी येण्याकरिता होणारी फरपट थांबवावे अशी मागणी जोर धरत आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top