Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: खावटी अनुदानातून मिळणारी अन्नधान्य किट कोरोनाने प्रभावित आदिवासींसाठी जीवनदायी - आमदार सुभाष धोटे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
खावटी अनुदानातून गोंडपिपरी येथील लाभार्थ्यांना अन्नधान्य किटचे वितरण आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स गोंडपिपरी - खावटी अनुदान योजने अंतर्गत अ...

  • खावटी अनुदानातून गोंडपिपरी येथील लाभार्थ्यांना अन्नधान्य किटचे वितरण
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
गोंडपिपरी -
खावटी अनुदान योजने अंतर्गत अनुसूचित जमाती कुटुंबांना साहाय्य करण्यासाठी जीवनावश्यक वस्तूंचे "अन्नधान्य किट वाटप" वितरण कार्यक्रम आमदार सुभाष धोटे यांच्या अध्यक्षतेखाली सुभद्राबाई सांगडा आश्रमशाळा गोंडपिपरी, येथे आयोजित करण्यात आले. 

या अंतर्गत गोंडपिपरी तालुक्यातील 1324 लाभार्थी आदिवासी कुटुंबियांना लाभ मिळणार आहे. किराणा स्वरुपात असलेल्या या किटमध्ये १२ वस्तुंचा समावेश करण्यात आला आहे. यात मटकी, चवळी, हरबरा, वाटाणा, उडीद डाळ, तर डाळ, साखर, शेंगदाने तेल, गरम मसाला, मिरची पावडर, मीठ, चहापत्ती इत्यादींचा समावेश आहे.

या प्रसंगी आमदार सुभाष धोटे यांनी उपस्थित लाभार्थी कुटुंबांना मार्गदर्शन करताना सांगितले की महाविकास आघाडीचे सरकार गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी संकल्प बद्ध आहे. कोरोणाची परिस्थिती लक्षात घेता  हे कीट गरजू आदिवासी कुटुंबांसाठी जीवनदायी ठरणार आहे. 

या प्रसंगी सभापती कृ.उ.बा.स सुरेश चौधरी, उपसभापती अशोक रेचनकर, अध्यक्ष ता.काँ.कमिटी तुकाराम झाडे, राजीवसिंग चंदेल, संभूपाटील येलेकर,  रामचंद्र कुरवतकर, अध्यक्ष रेखाताई रामटेके, वनिता वाघाडे, दर्शनात दुर्गे, प्रकाश मडावी, बालाजी चनकापुरे,आनंदराव कोडापे, नामदेव सांगळे, प्रवीण नरहरशेट्टीवार, सुधाकर जाधव यासह स्थानिक आदिवासी बांधव, शिक्षक वृंद, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेश धोटकर सहाय्यक प्रकल्प अधिकारी यांनी केले. संचालन आणि आभार प्रदर्शन अनिल झाडे यांनी केले.












About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top