Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: कुपोषण मुक्तीचे सेवा कलश आणि बाळु चे कार्य प्रेरणादायी - नगराध्यक्ष अरुण धोटे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
कोरपना येथे सेवा कलश फाऊंडेशन आणि बाळु संस्थेच्या संयुक्त विद्यमाने २५ कुपोषित बालकांना सकष आहार भेट आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स कोरपना -...
  • कोरपना येथे सेवा कलश फाऊंडेशन आणि बाळु संस्थेच्या संयुक्त विद्यमाने २५ कुपोषित बालकांना सकष आहार भेट

आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
कोरपना -
आमदार सुभाष धोटे यांच्या सामाजिक दायित्वातून सेवा कलश फाऊंडेशन राजुराचे संस्थापक अध्यक्ष अभिजित धोटे यांच्या पुढाकाराने आणि बाळु संस्थेच्या माध्यमातून कोरपना तालुक्यातील २५ कुपोषित बालकांना प्रत्येकी एक या प्रमाणे बाळु साहित्य किट भेट देण्यात आली. या प्रत्येक किट मध्ये २ किलो मोट, २ किलो चना, २ किलो मुंग, २ किलो बरबटी, २ किलो वटाना, १ किलो नाचणी, १ किलो शेंगदाणे, १ किलो गुळ हे बाळु साहित्य भेट देण्यात आले. 
या प्रसंगी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी सांगितले की राजुरा विधानसभा क्षेत्रातून कुपोषणाची समस्या सोडविण्यासाठी आमदार सुभाष धोटे यांनी पुढाकार घेतला आहे ही अभिनंदनीय बाब आहे. सेवा कलश फाऊंडेशन व बाळु यांचे सर्व सहकारी परिसरातून ही समस्या पुर्णपणे हद्दपार करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. या दोन्ही संस्थेचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. निश्चितपणे आपल्या सर्वांच्या सहकार्याने या क्षेत्रातून कुपोषण ही समस्या आटोक्यात येण्यास मदत होईल यात शंका नाही. 
या प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक अभिजीत धोटे, प्रमुख अतिथी उपसभापती सिंधुताई आस्वले, जिप सदस्य विनताई मालेकर, जिप सदस्य कल्पनाताई पेचे, पंस सदस्य तथा माजी सभापती श्यामभाऊ रणदिवे, माजी जिप सदस्य उत्तम पेचे, सुरेश मालेकर, माजी उपसभापती संभाशीव कोवे, जिवती काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणपत आडे, नितीन बावणे, सेवा कलश फाऊंडेशनचे सचिव शंतनू धोटे, गटविकास अधिकारी बाबाराव पाचपाटील, सीडीपीओ गणेश जाधव यासह कुपोषित बालक, त्यांचे आईवडील, अंगणवाडी सेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पत्रकार उपस्थित होते. 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रफुल्ल शेंडे यांनी केले तर प्रास्ताविक व आभार प्रदर्शन बाळु संस्थेचे अध्यक्ष अमित महाजनवार यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दोन्ही संस्थेच्या सदस्यांनी अनमोल सहकार्य केले. 











About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top